Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

केंद्र सरकारच्या फूड स्ट्रीट योजनेअंतर्गत शेगाव आणि शिर्डी येथे आधुनिक फूड स्ट्रीट हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये, असा एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 07:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : केंद्र सरकारच्या फूड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगाव आणि मराठवाड्यातील शिर्डी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांवर आधुनिक फूड स्ट्रीट हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये, असा एकूण २ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे भाविकांना दर्जेदार, सुरक्षित आणि पौष्टिक अन्नसेवा उपलब्ध होणार असून स्थानिक विक्रेत्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

“आवश्यकता भासल्यास ‘Operation Sindoor…”; लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींचा शत्रूराष्ट्रांना थेट इशारा

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात १०० ठिकाणी फूड स्ट्रीट हब विकसित करण्याची योजना राबविण्यात येत आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थांमुळे होणारे आजार, अन्न विषबाधा आणि अस्वच्छतेच्या समस्या कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. या माध्यमातून अन्न हाताळणी आणि विक्रीसाठी सुरक्षित व स्वच्छ मानके लागू करण्यात येणार आहेत.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आधुनिक सुविधा असलेले फूड स्ट्रीट हब उभारले जाणार आहे. याठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डीतही अशाच प्रकारचे फूड स्ट्रीट हब विकसित करण्यात येणार आहे.

या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे स्थानिक लघु व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. संघटित पद्धतीने व्यवसाय करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

“मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो..,” महिलेच्या विनयभंग प्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महाराष्ट्रातील या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांसाठी फूड स्ट्रीट हबला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. शेगाव आणि शिर्डी येथे येणाऱ्या लाखो भाविकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात राबविण्यात येणाऱ्या १०० फूड स्ट्रीट हब योजनेत महाराष्ट्रातील शेगाव आणि शिर्डीचा समावेश होणे ही राज्यासाठी महत्त्वाची बाब मानली जात असून, धार्मिक पर्यटनासोबतच अन्नसुरक्षा आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

Web Title: Food street hubs to be set up in shegaon and shirdi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

Khamgaon: कृषिमंत्र्यानी जाणले दुष्काळाचे वास्तव, शेतकऱ्यांशी संवाद; पिकांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
4

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.