Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti Conversion Law: सक्तीच्या धर्मांतराविरुद्ध महाराष्ट्रात ‘आरपार’ची लढाई; फडणवीसांच्या विधेयकाला ठाकरेंचा पाठिंबा

या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) विधेयकाच्या उद्देशाला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 17, 2026 | 02:33 PM
Maharashtra Anti-Conversion Law, Uddhav Thackeray Supports Mahayuti,

Maharashtra Anti-Conversion Law, Uddhav Thackeray Supports Mahayuti,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक सादर केले
  • धर्मांतर विरोधी विधेयकावर ठाकरे गटाचा सरकारला पाठिंबा
  • विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंत तुरुंगवास
Maharashtra Anti Conversion Law:  राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षातून विस्तवही जात नाही. भाजपच्या निर्यणांना ठाकरे गटाचा कायम विरोध असतो. शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संबंध खूपच ताणले गेले आहेत. पण राजकारणात कधी कोणाचा फार काळ मित्रही नसतो आणि फार काळ शत्रूही राहू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक दुर्मिळ प्रसंग समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या एका निर्णयाला खुला पाठिंबा दर्शवला आहे. हा मुद्दा सक्तीच्या धर्मांतराविरोधातील प्रस्तावित कायद्यालाशिवसेनेने (यूबीटी) सरकारला पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक सादर केले. महाराष्ट्रातील प्रस्तावित धर्मांतर विरोधी कायदा कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही. या विधेयकाचा उद्देश केवळ सक्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन होणारे धर्मांतर रोखण्यासाठी आहे.

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

१३ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ नुसार, विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या कायद्यानुसार केवळ बेकायदेशीर सिद्ध झालेले विवाहच न्यायालयाकडून रद्द केले जातील. अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्ती किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात, तर काही प्रकरणांमध्ये पोलीस स्वतःहून कारवाई देखील करू शकतात, असेही या विधेयकात नमुद करण्यात आले आहे.

राज्य सरकारने मांडलेल्या धर्मांतर विरोधी विधेयकाला विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महत्त्वपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. “धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि अवैध धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा मूळ उद्देश असून तो स्वागतार्ह आहे,” अशी भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडली.

विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, प्रत्येक धर्मात अशा काही प्रथा आहेत ज्यांचा मानवी हक्कांवर परिणाम होतो. अशा प्रथांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. हे विधेयक सादर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारचे अभिनंदन केले. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी करताना तो पूर्वग्रहदूषित नसावा आणि त्याद्वारे कोणत्याही विशिष्ट धर्माला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाऊ नये, अशी स्पष्ट सूचनाही त्यांनी सरकारला केली.

आधार कार्ड होणार अधिक सुरक्षित, UIDAI ने सुरु केला खास प्रोग्राम! एक्स पोस्ट शेअर करत दिली माहिती

यावेळी जाधव यांनी विधेयकातील एका तरतुदीवर गंभीर चिंता व्यक्त केली. प्रस्तावित कायद्यानुसार, स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आली आहे. “न्यायव्यवस्थेच्या तत्वानुसार पुरावे सादर करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षावर असायला हवी, आरोपीवर नाही,” असे मत त्यांनी मांडले. ठाकरे गटाच्या या सकारात्मक पाठिंब्यामुळे सभागृहात हे विधेयक मंजूर होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

राज्य विधिमंडळात मांडण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी विधेयकावर शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारवर जोरदार राजकीय प्रहार केला. “एखाद्या व्यक्तीला धमकी किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या विधेयकाच्या मूळ उद्देशाला आमचा विरोध नाही,” असे सांगतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय खेळींवर बोट ठेवले.

उद्धव ठाकरे यांनी सभागृहात विचारले की, जर धर्मांतरासाठी भीतीचा वापर करणे चुकीचे असेल, तर राजकीय नेत्यांना ‘पक्ष बदलण्यासाठी’ ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) सारख्या केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवणे हे देखील तितकेच चुकीचे नाही का? अशा प्रकारे राजकीय ‘धर्मांतर’ करणाऱ्यांविरोधातही सरकारने कठोर कायदा आणावा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीचे मोठे अपयश असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेस आणि मित्रपक्षांचा तीव्र विरोध

दरम्यान, या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) विधेयकाच्या उद्देशाला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे. हे विधेयक सविस्तर चर्चेसाठी संयुक्त निवड समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधी आमदारांनी केली आहे.

काँग्रेस आमदार नितीन राऊत आणि अस्लम शेख यांनी भीती व्यक्त केली की, या कायद्यामुळे नागरिक कायदा हातात घेऊ शकतात. दोन प्रौढ व्यक्तींनी स्वेच्छेने विवाह केल्यास तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार दिल्याने संविधानातील वैयक्तिक गोपनीयतेच्या अधिकारावर गदा येईल, असा दावा त्यांनी केला. तसेच, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी आणि रईस शेख यांनी हे विधेयक संविधानाच्या कलम १४, १५ आणि २१ चे उल्लंघन करणारे असल्याचे म्हणत याला कडाडून विरोध दर्शवला आहे.

 

 

Web Title: Forced conversions in maharashtra 7 years prison for illegal religious conversions under new bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mahayuti Government
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.