Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचा झेंडा हाती घेण्यापूर्वी अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अशोक चव्हाण यांनी आज आपण भाजपमध्ये जाहीर प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कॉंग्रेसची साथ सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 13, 2024 | 01:12 PM
भाजपचा झेंडा हाती घेण्यापूर्वी अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : संपूर्ण राजकीय काराकीर्द कॉंग्रेससोबत (Congress) राहिलेले व तब्बल 40 वर्षे सक्रिय राजकारणामध्ये राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाच्या पदांचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) दिला आहे. काल अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राज्याचे राजकीय चक्रे जोरदार फिरले. यानंतर अशोक चव्हाण पुढे कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशोक चव्हाण यांनी आज आपण भाजपमध्ये जाहीर प्रवेश (Ashok Chavan Join BJP) घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कॉंग्रेसची साथ सोडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे. दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य प्रवेश होण्याची शक्यता आहे.” अशी घोषणा स्वतः अशोक चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर आपल्या सोबत इतर कोणतीही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. ‘पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही आमंत्रित केलेलं नाही,’ असे देखील अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या कामातूनच मी उत्तर देईन

नवीन राजकीय सुरुवात करायला निघालेल्या अशोक चव्हाणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “जिल्ह्यातील, मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन. माझ्या कामातूनच मी उत्तर देईन” असे ठाम मत अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशापूर्वी व्यक्त केले आहे.

Web Title: Former cm ashok chavans first reaction before publicly entering the bjp party in mumbai nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2024 | 01:12 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • BJP
  • political news

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.