Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा?” सिंचन घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2024 | 06:36 PM
“… यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा?” सिंचन घोटाळ्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

कराड: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक उमेदवारांनी अर्ज देखील भरले आहेत. दरम्यान राज्यात प्रचारसभा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान कराडमध्ये बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर भाष्य केले आहे. अजित पवारांनी तासगाव-कवठे महकाळ मतदारसंघातील सभेत बोलताना दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी सिंचन प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढली होती. ती कोणताही घोटाळा उघड करण्यासाठी नव्हे, तर त्याबाबतची माहिती मागवण्यासाठी काढली. मुळात याप्रकरणी घोटाळा हा शब्द मी कधी उच्चारलाच नाही. परंतु, भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुक प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ७०  हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे जाहीरपणे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यापेक्षा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी लोकनेते विलासकाका पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची उपस्थिती होती.

सिंचन घोटाळ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या आरोपांवरून त्यावेळी मी या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढली होती. त्याची पुढे अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली. मात्र, त्यानंतर काही घडामोडी करून माझे सरकार पाडण्यात आले. यामुळे सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शिक्षा मला भोगावी लागली, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा: Sangali News: आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; सिंचन घोटाळ्यावर भाष्य करत अजित पवारांचे गंभीर आरोप

मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारांचा निवडणुकीवर काय परिणाम होईल? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मुळात इंग्रजांच्या काळात राजश्री शाहू महाराजांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. यावरून मराठा आरक्षणाबाबतची माझी भूमिका स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जरांगे-पाटील यांची निवडणुकीबाबत अध्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. ते मतदारसंघानुसार आपली भूमिका घेणार असल्याचे चर्चा असून अंतिम उमेदवार अर्ज जाहीर झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यावेळी म्हणाले.
तसेच हरियाणातील निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणूक व निकालावर काय परिणाम होईल? या प्रश्नावर ते म्हणाले, मुळात महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांतील निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही. त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर  हरियाणाच्या निवडणुकीच्या तसेच निकालाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी व्यक्त नमूद केले.  तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा दारू पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही येथील जनता निर्णायक भूमिका घेईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Former cm prithviraj chavhan statement on irrigation scam related to ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 06:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • narendra modi
  • pruthviraj chavhan

संबंधित बातम्या

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा
1

अजितदादा माफ करा, भावनेच्या भरात…; बाळराजेंच्या ओपन चॅलेंजनंतर राजन पाटलांचा माफीनामा

Amol Mitkari on Rajan Patil: “…. वाया गेलेली मोकाट कार्टी! अजित पवारांना डिवचणाऱ्यांवर मिटकरींची जहरी टीका
2

Amol Mitkari on Rajan Patil: “…. वाया गेलेली मोकाट कार्टी! अजित पवारांना डिवचणाऱ्यांवर मिटकरींची जहरी टीका

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज
3

सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
4

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.