Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narayan Rane On Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 22, 2025 | 09:49 PM
Narayan Rane On Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी..."

Narayan Rane On Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी..."

Follow Us
Follow Us:

मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, असा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आज या प्रकरणावर माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.

नेमके काय म्हणाले नारायण राणे?

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दोन फोन आपल्याला आले होते, असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात आपल्याला सहकार्य करण्याची विनंती  केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. या प्रकरणात मी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. पण तो संध्याकाळी कुठे जातो, ते पाहून जरा काळजी घेण्याचे आवाहन मी उद्धव ठाकरे यांना केल्याचे देखील यावेळी राणे म्हणाले.

नेमके काय आहे प्रकरण? 

दिशा सालियन मुंबईत एका कंपनीत टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. 8 जून 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा खाली पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यानंतर दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला होता. आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे. मात्र दिशाच्या वडिलांनी यापूर्वी या प्रकरणी आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता अचानक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केलं आहे., मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय. दिशा सालियनचा खून झाला होता. आदित्य ठाकरेंचं ८ जूनचं मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचं काय झालं? हे मी विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? आता तर थेट तिच्या वडिलांनीच गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.

Disha Salian Case : मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?, वडिलांची हायकोर्टात याचिका

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांनी घेरलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या प्रकरणामध्ये मी बातम्या वाचत आहे. बातम्या देत असताना वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे. तुम्ही पण वस्तुस्थितीला धरूनच बातमी दिली पाहिजे. हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आहे. तिचे वडील न्यायालयामध्ये गेले आहेत, न्यायालय काय तो निर्णय देईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

 

Web Title: Former minister and mp narayan rane press conference for disha salian case aditya and uddhav thackeray marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • Narayan Rane
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
2

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
3

Devendra Fadnavis News: ‘त्या’ खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
4

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.