Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात CBIने FIR दाखल केल्यानंतर निलेश राणेंनी तपासावर भाष्य केलं. आरोपी कोण हे आता सांगता येणार नसून तपासानंतरच चित्र स्पष्ट होईल, असं राणे म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 08:54 PM
‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • CBIने दिशा सालियन प्रकरणात FIR दाखल करून तपास सुरू केला आहे.
  • ‘गुन्हा करणारे कोणीही असतील, त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, असं निलेश राणे म्हणाले.
  • सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंविरोधात 500 कोटींच्या मानहानीची नोटीस दिल्यानंतर राजकीय वातावरण तापलं
 

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBIने या प्रकरणात FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. तपास सुरू असताना कोण आरोपी आहे किंवा कोण नाही, याबाबत आताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं राणे यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे ?

माध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की, “CBIने मालवणी पोलिसांकडून CDR, टॉवर लोकेशन रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट यांसारखी कागदपत्रं मागवली आहेत. आता CBI या सर्व बाबींच्या आधारे तपास करणार असून, प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल,” असं त्यांनी सांगितलं.

‘ज्यांनी गुन्हा केलाय, त्यांना सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे. पण ते कोण असावेत हे मी आता सांगू शकत नाही. तपासानंतरच ते समोर येईल,’ अशी भूमिका राणेंनी मांडली.

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

या प्रकरणात सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी न्यायालयासमोर काही पुरावे सादर केल्याचाही राणेंनी उल्लेख केला. प्रकरणातील काही बाबी जुळत नसल्याचा दावा करत, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे आणि तथ्यांवर चर्चा होईल, असं त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात CBIने FIR दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. हायकोर्टाने 2 सप्टेंबर रोजी CBIला तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर FIR नोंदवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली. शनिवारी ते वकिलांसह मातोश्रीवर पोहोचले. नोटीसमध्ये सात दिवसांत सार्वजनिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली असून, माफी न मागितल्यास 500 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नोटीशीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी नोटीस स्वीकारली.

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना ओळखत नसल्याचं सांगत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे एका बाजूला सतीश सालियान यांची कायदेशीर भूमिका, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांच्याकडून आरोपांना दिलेला नकार आणि आता सुरू झालेला CBI तपास, यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आता CBIच्या तपासातून कोणती माहिती समोर येते आणि न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Disha salian case cbi fir nilesh rane satish salian aaditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • nilesh rane

संबंधित बातम्या

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
1

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!
2

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!

Nilesh Rane : ‘हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध,’ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न
3

Nilesh Rane : ‘हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध,’ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन
4

Raj Thackeray : आज संध्याकाळी राज गर्जना, स्थानिकांची भेट घेत ठाकरी शैलीत दिलं मोठं आश्वासंन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.