Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Dr Babasaheb Ambedkar: मुंबई विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषीविषयक विचारांवर सखोल चर्चा करण्यात आली. सहकारी शेती, कृषी भांडवल, सिंचन व्यवस्था आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण कसे साधता येईल, यावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 15, 2026 | 05:59 PM
सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Follow Us
Follow Us:
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषीविषयक विचारांची आजही प्रासंगिकता
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृषी विचारांतून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग
  • मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात सहकारी शेती, कृषी भांडवल, सिंचन आणि औद्योगिकीकरणावर विचारमंथन
नीता परब, मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले कृषीविषयक विचार आजच्या कृषी धोरणांसाठीही दिशादर्शक असून, लहान भूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, सहकारी शेती, कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक, सिंचन आणि कृषी-आधारित औद्योगिकीकरण यावर नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र आणि डॉ. आंबेडकर चेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कृषीविषयक योगदान’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी भारतातील लहान भूधारणा आणि कृषी यांत्रिकीकरणाच्या मर्यादांकडे लक्ष वेधले. जमीनधारणांचे एकत्रीकरण, शासकीय आर्थिक पाठबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे लहान शेतकऱ्यांना सक्षम करता येईल, असे त्यांनी सांगितले. बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आणि कृषी-आधारित उद्योगांबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

एग्रीकल्चर प्राईस कमिशन, महाराष्ट्राचे सदस्य डॉ. परशराम पाटील यांनी डॉ. आंबेडकरांनी सुचविलेली सहकारी शेती आजच्या काळातही महत्त्वाची असल्याचे नमूद केले. लहान भूधारकांनी एकत्र येऊन संसाधनांचा सामूहिक वापर केल्यास उत्पादनक्षमतेत वाढ होऊ शकत असल्याचे सांगितले. आजच्या एफपीओच्या संकल्पनेत या विचारांचे प्रतिबिंब दिसत असल्याचे सांगत कृषी क्षेत्रात भांडवलाची उपलब्धता वाढवून शेतीला कृषी-आधारित उद्योगांशी जोडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे डब्ल्यू.एस.के.एस.चे संचालक डॉ. बालराजू यांनी भूमिहीन शेतमजूर, लहान भूधारक आणि ग्रामीण आर्थिक विषमतेचा डॉ. आंबेडकरांनी केलेला अभ्यास अधोरेखित केला. कृषी क्षेत्रातील अतिरिक्त श्रमशक्तीला पर्यायी रोजगार देण्यासाठीच्या विविध शक्यता तपासून पाहाव्यात यावर त्यांनी जोर दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गुजरात विद्यापीठ, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आशिष कुमार दवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृषीविषयक विचारांवर प्रकाश टाकताना सांगितले की, बाबासाहेबांनी जात-धर्माचा विचार न करता देशातील सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला. भाकरा-नांगलसह विविध धरणांच्या पाण्याचे योग्य नियोजन, शेती व उद्योगासाठी पाण्याचे समतोल वाटप, शेतीला राष्ट्रीय उद्योगाचा दर्जा आणि कृषी विकासासाठी औद्योगिक विकासाची गरज यावर त्यांनी भर दिला. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती केल्यास उत्पादनक्षमता वाढेल, असा बाबासाहेबांचा विचार होता, असेही डॉ. दवे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मिक सरवदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक नियोजन, कृषी सुधारणा, सिंचन आणि ग्रामीण विकासविषयक विचार २१व्या शतकातही महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातून १४६ संशोधन लेख प्राप्त झाले असून, त्यापैकी निवडक लेख सादरीकरणासाठी निवडण्यात आले असून संशोधन लेखांचे शैक्षणिक निकषांनुसार परीक्षण करून निवडक लेख प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यानगरीतील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी सभागृहात आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात कृषी धोरण, ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी शेती, जलव्यवस्थापन, कृषी औद्योगिकीकरण आणि सामाजिक न्याय या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Web Title: Dr babasaheb ambedkar agricultural thoughts relevance farmers economic empowerment mumbai university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • agricultural
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Farmers

संबंधित बातम्या

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी
1

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.