Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Farmer News :- १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

रायगड जिल्ह्यातील १,८५९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत या शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करून त्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Aug 14, 2026 | 05:20 PM
Maharashtra Farmer Loan Waiver

Maharashtra Farmer Loan Waiver

Follow Us
Follow Us:

अलिबाग : शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ची रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १,८५९ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये इतकी रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. ही रक्कम रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करून त्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला.

या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वाटप करण्यात आलेले अल्पमुदत पीककर्ज तसेच पुनर्गठित मध्यम मुदत कर्ज, जे ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड झालेले नाही, अशा कर्जाच्या मुद्दल व व्याजासह कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे.

रायगडमध्ये पावसाची स्थिती गंभीर; 2470.6 मिमी पाऊस, पनवेलमध्ये 5 जणांचा मृत्यू

कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

• याशिवाय, २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाची तरतूद करण्यात आली आहे.

• अशा शेतकऱ्यांना किमान ५ हजार रुपये ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.

तक्रार निवारणासाठी समित्यांची यंत्रणा

अंमलबजावणीत पारदर्शकता आणि योग्य समन्वयासाठी राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर नियंत्रण समित्या कार्यरत आहेत. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, बँक व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली योजनेची कार्यवाही सुरू आहे. प्राप्त झालेल्या १० तक्रारींपैकी ५ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

पात्र शेतकऱ्यांनी यादी तपासण्याचे केले आवाहन

• योजनेचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखा, सेवा संस्था किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

• ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा CSC केंद्रावर जाऊन अॅग्रीस्टॅक/फार्मर आयडी नोंदणी तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आकडेवारी

१,८५९ — शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये शासनाकडून प्राप्त

१२,६८२ — शेतकरी खात्री पोर्टलवर

आधार प्रमाणीकरण टक्केवारी — ३९ टक्क्यांपेक्षा अधिक

विविध कारणांमुळे काही खाती प्रलंबित

• अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याने प्रलंबित खाती — ४,३६६
• मृत खातेदार — ५३७
• दुसऱ्या जिल्ह्यातील खातेदार — १४४

Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप

Web Title: Maharashtra farmer loan waiver 2026 raigad 1859 farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra farmers
  • maharashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
2

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
3

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.