Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: डोणगावमध्ये ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ प्रकल्पात गैरव्यवहार? गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे BOT तत्त्वावर उभारलेल्या गाळ्यांच्या देखभाल खर्चासाठी ग्रामपंचायतीने नियम मोडून वित्त आयोगातील ₹६.४७ लाख खर्च केल्याची तक्रार झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 07, 2025 | 03:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी डोणगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली
  • वित्त आयोगातून प्राप्त गावविकास निधीतून तब्बल ₹६ लाख ४७ हजार खर्च केले
  • निधी कुठे आणि कसा खर्च झाला याची सखोल चौकशी होणे आवश्यक
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे २०११ ते २०१३ दरम्यान ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आली आहे. या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीने नियमानुसार ठेकेदाराने करायच्या देखभाल आणि सुविधा खर्चासाठी गावाच्या विकासाकरिता मिळालेला निधी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि. ५) मेहकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी डोणगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. (Fraud in ‘Build-Use-Transfer’ project in Dongaon Buldhana)

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

डोणगावच्या आठवडी बाजार परिसरात, महामार्गालगत व ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, तब्बल १२० च्या आसपास व्यापारी गाळे उभारण्यात आले होते. बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वानुसार या गाळ्यांचा खर्च, देखभाल, दुरुस्ती ही २०३३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची जबाबदारी ठरवण्यात आली होती. नियमानुसार ग्रामपंचायतीचा या खर्चाशी काहीही संबंध नाही. मात्र, तक्राऱ्यांनुसार ग्रामपंचायतीने सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त गावविकास निधीतून तब्बल ₹६ लाख ४७ हजार खर्च केले.

हा निधी गावाच्या कृती आराखड्यानुसार मूलभूत विकासकामांसाठी वापरला जाणे अपेक्षित होते. परंतु, गावाच्या विकासासाठी असलेला हा निधी ठेकेदाराने करावयाच्या कामांवर खर्च करण्यात आल्याचा आरोप शैलेश सावजी यांनी केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. तक्रारीनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेजस गवई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोणगाव ग्रामपंचायतीत भेट दिली. त्यांनी या प्रकरणासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच संबंधित कागदपत्रांची पाहणी केली. खर्चाचे विवरण, मंजुरी प्रक्रिया आणि BOT करारातील अटींची पडताळणीही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!

या चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीने नेमका कोणत्या कारणास्तव ठेकेदाराची जबाबदारी स्वतःवर घेतली? आणि नियमांकडे दुर्लक्ष करून वित्त आयोगातील निधीच का वापरला? असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ग्रामपंचायतीने विकास निधीचा वापर नियमबाह्यपणे केल्यास त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तक्रारदार शैलेश सावजी यांनी सांगितले की, “ठेकेदाराच्या जबाबदारीतील कामांसाठी ग्रामपंचायतीने गावविकास निधी खर्च करणे ही मोठी अनियमितता आहे. निधी कुठे आणि कसा खर्च झाला याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” दरम्यान, विस्तार अधिकारी तेजस गवई यांचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल.

Web Title: Fraud in build use transfer project in dongaon buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Buldhana
  • fraud

संबंधित बातम्या

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची ऑनलाईन फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर
2

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.