Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, एक ठार, तर ३३ प्रवासी जखमी

Gadchiroli Bus Accident News : गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मुरखळा गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2026 | 12:44 PM
चालकाचे नियंत्रण सुटले अन्...! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, एक ठार, तर ३३ प्रवासी जखमी

चालकाचे नियंत्रण सुटले अन्...! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, एक ठार, तर ३३ प्रवासी जखमी

Follow Us
Follow Us:

Gadchiroli Bus Accident News Marathi : मुरखाला गावाजवळ आज सकाळी (21 मे 2026) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ​ख्वाजा शाहबूद (७०)असे अपघातातमृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर शिवांश स्वप्नील नवघरे (७ महिने ) हा बालक गंभीर जखमी आहे. गडचिरोली-उमरखेड बस (एमएच १४ बीटी – ०७४०) नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती.

मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; ‘बोगस’ मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

आज सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बस गडचिरोली डेपोतून उमरखेडसाठी निघाली होती. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. मात्र, गडचिरोलीजवळील मुरखाला गाव परिसरात पोहोचल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले, ज्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. बस उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या भीषण अपघातात ख्वाजा शहाबुद्दीन नावाच्या एका वृद्ध प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. एका तरुण मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णवाहिकेने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

जखमी प्रवाशांची नावे

‎धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे आणि ज्योती अविनाश पाल (सर्व रा.गोकुळनगर, गडचिरोली), श्रीहरी खडकर आणि बेबीबाई श्रीहरी खळकर (दोघे. रा. रामनगर, गडचिरोली), ‎चैतन्य मारुती मेडीवर, तानिया मारुती मेडीवर, वैशाली मारुती माडेवार, रूपाली खनके, ललिता यशवंत खणके, ऋषभ निळकंठ खडके, सचिन शामराव वाळके (सर्व रा. चंद्रपूर), जयश्री सचिन वरभे, सचिन शामराव वरदे, जयश्री खाणके (सर्व रा. वरोरा जि. चंद्रपूर), रत्नाकर दादाजी राऊत, पार्थ गणेश राऊत (दोघेही रा. चांगलीबूज), मंगला संजय कळसकर (रा. नांदगाव फाटा ता. सावली जि.. चंद्रपूर), लक्ष्मीबाई रामदास दुर्गेवार, भूषण नरेश दुर्गेवार (रा. सिंदेवाही जि. चंद्रपूर), चालक रोहित देशमुख (रा. अकोला), वाहक संदीप प्रल्हाद पवार, विकी सुरेश शेंडे, तारा साबळे (सर्व रा. वणी जि. यवतमाळ), ​श्वेता स्वप्निल नवघडे (रा. चामोर्शी), ​डॉ.गणेश जैन (रा.त्रिमूर्ती चौक, गडचिरोली), ​सुमन नामदेव कत्तलवार (गडचिरोली), ​व्यंकट नरेश ढगे (नवेगाव ता. गडचिरोली), ​अश्विनी लक्ष्मण तोरपे ( रा.कांदोळी ता.कुरखेडा), ​किशोर कुमाजी गावतुरे (रा.कारवाफा ता. धानोरा), ​गौरव यशवंतराव कुमरे ( रा.गोंदिया) यांचा जखमींत समावेश आहे.

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

Web Title: Gadchiroli umarkhed st bus accident 50 passengers injured one dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Gadchiroli
  • msrtc

संबंधित बातम्या

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
1

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका
2

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.