Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: टोरंट विद्युत कंपनीला ठाणे जिल्ह्यात अन्य पर्याय द्या, मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईच्या धर्तीवर भिवंडी सह दिवा आणि अन्य परिसरासाठी अन्य विद्युत कंपन्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 06:17 PM
टोरंट विद्युत कंपनीला ठाणे जिल्ह्यात अन्य पर्याय द्या, मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टोरंट विद्युत कंपनीला ठाणे जिल्ह्यात अन्य पर्याय द्या, मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर भिवंडी सह कल्याण ग्रामीण भागासाठी विद्युत कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. टोरंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडीत उसळणारी जण आंदोलन आता कल्याण ग्रामीण भागात देखील उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर भिवंडी सह दिवा आणि अन्य परिसरासाठी अन्य विद्युत कंपन्यांचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

एसटीच्या सवलत मूल्य प्रवासी संख्येवर सरकारची शंका, एसटी कर्मचारी काँग्रेसची टीका

भिवंडी लोकसभेत विद्युत ग्राहकांना हैराण केलेल्या टोरंट कंपनी विरोधात आता कल्याण लोकसभेतील ग्राहक देखील आक्रमक झाले आहेत. कल्याण लोकसभेतील दिवा विभागासह १४ गावांमध्ये टोरंट कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे. मात्र या कंपनीच्या विरोधात नागरिकांनी आगमनाच्या पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. अवाढव्य देणारे वीजबिल, विद्युत ग्राहकांवर करण्यात येणाऱ्या पोलीस कारवाया यांसह अन्य कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

कल्याण ग्रामीण भागातील दिवा,कळवा शहरासह परिसराला आणि १४ गावांना अनागोंदी कारभाराचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे. त्यामुळे या कंपनीला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण भागात टोरंट कंपनीने प्रवेश केल्यानंतर तत्कालीन आमदार राजू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर कंपनीच्या विरोधातील ठाण्यात असलेल्या भूमिपुत्रांच्या आंदोलना सहभाग घेतला होता. पाच वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात टोरंट कंपनीला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे नेते राजू पाटील हे करत आहे. मात्र ठाकरे सरकार नंतर शिंदेच्या सरकारने देखील मनसेची ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या महत्वाची मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे आता राज्याचे पालकत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनसेकडून हि मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्युत ग्राहक मनसे नेते राजू पाटील यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष देऊन राहिले आहेत.

विद्युत ग्राहकांना होणारे फायदे !

– ग्राहकांची समस्यां तातडीने सोडवण्यात येतील.

– कंपन्यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र युनिट प्रमाणे दर असणार .

– कंपन्यांकडून नागरिकांना योग्य वागणूक दिली जाईल.

– पर्याय उपलब्ध झाल्याने दबाव शाही मधून मुक्तता होणार.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा…; मुख्य सचिवांनी दिले आदेश

Web Title: Give other options to the torrent electric company in thane district demands the mns leader from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • kalyan
  • raju patil
  • thane

संबंधित बातम्या

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
1

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
2

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल
3

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
4

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.