Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. गावोगावी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2025 | 12:09 PM
'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या'; रयत क्रांती संघटनेची मागणी

'अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या'; रयत क्रांती संघटनेची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

कराड : सातारा जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग, घेवडा आदी पिके काढणीला आली असतानाच गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पिके कुजून वाया गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने काढणी केलेले पीक बाहेर काढणेही अशक्य झाले आहे.

सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत ही तुटपुंजी असून, त्यातून बियाण्यांचा खर्चही भागत नाही, अशी नाराजी शेतकऱ्यांत आहे. सोयाबीनसारख्या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे सरकारने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले. गावोगावी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी तांत्रिक व नेटवर्कच्या अडचणीमुळे ई-पीक पाहणी केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत आणि ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके यांच्यासह इतर अनेकांची उपस्थिती होती.

नुकसानभरपाई दिल्यास शेतकऱ्यांची दिवाळी गोड

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अतिवृष्टीमुळे कडू होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 50 हजार नुकसानभरपाई दिल्यासच त्यांची दिवाळी गोड होईल. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला.

हेदेखील वाचा : कासेगाव परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचे थैमान; शेतकऱ्यांवर आस्मानी संकट, शेताला तळ्याचे स्वरुप

Web Title: Give rs 50000 per hectare assistance to farmers affected by heavy rainfall demand of rayat kranti sanghatana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
2

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
4

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.