'विना कपात पहिली उचल 3752 द्या'; राजू शेट्टी यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखानदारांनी विना कपात ३७५२ रूपये द्यावेत अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे पार पडलेल्या ऊस परिषदेत केली. कारखानदारांनी आमची मागणी पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या ऊस परिषदेस राज्यभरातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते.
शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे विक्रम सिंह क्रीडांगणावर २४ वी ऊस परिषद पार पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस परिषदेच्या घेतली जाते या परिषदेमध्ये यंदाच्या गळीत हंगामातील ऊस दराचा निर्णय घेतला जातो. साखर कारखानदार मोठ्या प्रमाणात काटामारीचे तंत्र अवलंबत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज ऊस उत्पादन घ्यायचे झाले तर शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभा आहे.
हेदेखील वाचा : 10 नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही…; राजू शेट्टींचा इशारा
रासायनिक खताचे दर वाढले आहेत. शेतमजुरांचा प्रश्न आहे, मशागतीच्या दर वाढले आहेत. पर्जन्यमान बे भरवशाचा आहे, अशा संकटातून मार्गक्रम करत आज शेतकरी आपली शेतजमीनत पिकं घेत आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले कारखाने त्यांच्या माणगुटीवर बसून पैसे काढून घेत आहे, हे आम्ही कधीही सहन करणार नाही. यंदाच्या गळीत हंगामात आमच्या मागणीचा दहा दिवसात विचार करावा. अन्यथा आम्ही केलेल्या मागणीचा विचार सरकारने केला नाहीत तर दहा नोव्हेंबर नंतर राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
दरम्यान, आजच्या या ऊस परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात सहमती दर्शवली. आजच्या या ऊस परिषदेत जिल्हा अध्यक्ष अजित पवार, डॉक्टर महावीर अकोले, रामचंद्र फुलारे, सुभाष शेट्टी, बाळासाहेब पाटील, तानाजी वठारे, बंडू चौगुले, सचिन शिंदे, विक्रम पाटील, अण्णासो मगदूम, श्रीकांत पाटील या माजी प्रमुखांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.