Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Doodh Sangh Election : गोकुळमध्ये बंटी पाटलांचा ‘कंडका’; विश्वजीत कदम म्हणाले, ‘मानलं राव तुम्हाला!’

Gokul Doodh Sangh Election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बाजी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. या निकालानंतर विश्वजीत कदम यांचं वक्तव्य चर्चेत आलं असून रोहित पवारांनीही बंटी पाटील यांचं अभिनंदन केलं आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 07:47 PM
Vishvajeet kadam and satej patil

Vishvajeet kadam and satej patil

Follow Us
Follow Us:
  • गोकुळ मध्ये सतेज पाटील गटाची बाजी
  • महायुतीला मोठा धक्का
  • विश्वजित कदम यांच्या प्रतिक्रिया चर्चेत
कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनं पुन्हा एकदा वातावरण तापवलं आहे. सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 16-9 असा विजय मिळवल्याचं आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. या निकालानंतर बंटी पाटील यांचं राजकीय वर्तुळातून अभिनंदन होत असून, विश्वजीत कदम यांची खास शैलीतील प्रतिक्रियाही चांगलीच चर्चेत आली आहे.

‘मानलं राव तुम्हाला’; विश्वजीत कदमांचा डायलॉग व्हायरल

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीकडून अनेक दिग्गज नेते मैदानात होते. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

#गोकुळ 16-09
अभिनंदन बंटीदादा, मानलं राव तुम्हाला!
शेवटी काय, तो कंडका पाडलाच! 🔥💪
@satejp https://t.co/62xFcVoXgF
— Dr. Vishwajeet Kadam (@vishwajeetkadam) October 19, 2026

निकालानंतर विश्वजीत कदम यांनी सतेज पाटील यांचं अभिनंदन करत, “अभिनंदन बंटीदादा, मानलं राव तुम्हाला. शेवटी काय, तो कंडका पाडलाच!” अशी प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, आधीच्या भाषणातील ‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारून करायचं’ या विधानाचीही आठवण काढली जात आहे.

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का

रोहित पवारांनीही केलं अभिनंदन

आमदार रोहित पवार यांनीही या विजयाबद्दल सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेत सभासदांच्या हिताला प्राधान्य मिळावं आणि दूध उत्पादकांना चांगले दिवस यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच, पैसा आणि सत्तेच्या बळावर अडथळे निर्माण झाले तरी संघर्ष सुरू ठेवण्याचा संदेश या निकालातून मिळतो, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

मुश्रीफ-महाडिक कुटुंबालाही धक्का

या निवडणुकीत महायुतीसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे प्रमुख नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना आलेलं अपयश. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ आणि भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांचा पराभव झाल्याचं वृत्त आहे. शौमिका महाडिक यांना 120 मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याची माहिती दिली जात आहे.

एकूणच, गोकुळच्या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीच्या या कामगिरीचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप, RTI कार्यकर्ते सुनील गुजरांना मारहाण केल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघ निवडणुकीत कोणत्या आघाडीने विजय मिळवला?

    Ans: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने विजय मिळवला.

  • Que: गोकुळ निवडणुकीनंतर विश्वजीत कदम काय म्हणाले?

    Ans: विश्वजीत कदम यांनी सतेज पाटील यांचं अभिनंदन करत, “मानलं राव तुम्हाला. शेवटी काय, तो कंडका पाडलाच!” अशी प्रतिक्रिया दिली.

  • Que: गोकुळ निवडणुकीत कोणत्या प्रमुख नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवारांचा पराभव झाला?

    Ans: मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांचा पराभव झाला आहे.

Web Title: Gokul doodh sangh election satej patil vishwajeet kadam reaction vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Gokul Milk
  • rohit pawar
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का
1

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 
2

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांचा गनिमी कावा, गोकुळच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा 

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
3

Rohit Pawar : ‘अजितदादांचा पक्ष सक्षम नाही, अर्थखातं फडणवीसांनी चोरलं,’ रोहित पवारांच्या विधानाने खळबळ

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
4

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.