Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh Mahasangh: ‘गोकुळ’वर प्रशासक येणार! हायकोर्टाने मुदतवाढ नाकारल्याने विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का

गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत असून, मुदतवाढ नाकारल्यामुळे संघाच्या कारभारावर प्रशासक नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 09:15 AM
Gokul Dudh Mahasangh Election 2026, Gokul Dudh Sangh Kolhapur, Gokul Election 2026, Bombay High Court Kolhapur Circuit Bench

Gokul Dudh Mahasangh Election 2026, Gokul Dudh Sangh Kolhapur, Gokul Election 2026, Bombay High Court Kolhapur Circuit Bench

Follow Us
Follow Us:
  • गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत आहे
  • गोकुळकडून न्यायालयाकडे एक वर्षाची मुदतवाढ मागण्यात आली होती
  • निवडणूक तातडीने जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक भूमिका
Goku Dudh Mahasangh Politics:  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी (३० एप्रिल) महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने गोकुळवर प्रशासक नेमण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.

गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत असून, मुदतवाढ नाकारल्यामुळे संघाच्या कारभारावर प्रशासक नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्यांनी पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LPG सिलेंडर कनेक्शनबाबत सरकार मोठा निर्णय घेणार; तुमच्याकडेही PNG, LPG दोन्ही आहे तर आता

दरम्यान, सभासद संस्था व अवसायानातील संस्थांच्या सुनावणीचे कारण देत गोकुळकडून न्यायालयाकडे एक वर्षाची मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ दूध संघाने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी केला आहे. पण, ‘ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

२८ एप्रिल रोजी मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीतील प्रमुख नेत्यांची सुमारे तास ते दीड तास बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक तसेच युवा नेते समित कदम आदी उपस्थित होते.

सिंचनासाठी आता मिळणार मुबलक पाणी! शेतकऱ्यांची शेती येणार सिंचनाखाली; केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांचा पुढाकार

या बैठकीत गोकुळ निवडणुकीसंदर्भातील नव्या कायद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक तातडीने जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच नव्या कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती देत, त्यावर उपाय शोधण्यासाठी कायदे सल्लागारांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर, गोकुळची निवडणूक महायुतीच्या एकजुटीने लढवावी, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे नवीद मुश्रीफ यांनी नमूद केले आहे.

 

 

Web Title: Gokul milk union crisis bombay high court rejects extension for current board

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Gokul Milk
  • Hasan Mushrif
  • Kolhapur Politics

संबंधित बातम्या

‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा
1

‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
3

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
4

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.