संग्रहित फोटो
एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Emplyees) एका दिलासादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या पगारासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, वास्तविक पगार आणि अनुषांगिक लाभासाठी 360 कोटी रुपयांची गरज असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
[read_also content=”माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’, टिकेनंतर आता सुबोध भावेचं स्पष्टीकरण https://www.navarashtra.com/movies/my-statement-was-distorted-subodh-bhaves-explanation-after-the-beigh-crticized-nrps-311194.html”]
पण एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला 360 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील 300 कोटी रुपये एप्रिलसाठी, तर 360 कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत. आता शिंदे सरकार सत्तेत येताच राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या पगारासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
[read_also content=”राज्यात लवकरच महाराष्ट्र राज्य लिफ्ट कायदा, उर्जा विभागाच्या परिपत्रकानंतर सरकारचा निर्णय https://www.navarashtra.com/movies/my-statement-was-distorted-subodh-bhaves-explanation-after-the-beigh-crticized-nrps-311194.html”]