एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात केली शासकीय महापूजा (फोटो - एक्स)
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तांच्या उत्साहात कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक ही पूजा केली असून यावेळी त्यांच्या मांडीवर नातू रुद्रांश असल्याचे दिसून आले. यावेळी राज्यावर दुष्काळाचे संकट असताना राज्याला यातून बाहेर काढण्याचे साकडे उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे मागितल्याचे सांगितले. याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून सुमारे २५ तोळ्यांचा हार अर्पण करण्यात आला. यावर सुंदर असे फुलांचे आणि कोयऱ्यांचे नक्षीकाम करण्यात आले होते.
‘या’ शेतकरी दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसह शेतकरी दाम्पत्याला ‘मानाचा वारकरी’म्हणून पूजा करण्याचा मान मिळतो. यंदाच्या कार्तिकी एकादशीला नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या दाम्पत्याला ही संधी मिळाली. त्यांनी शिंदे कुटुंबासह विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. या दाम्पत्याने ११ वर्षे वारी केली असून त्यांना कार्तिकीच्या निमित्ताने पूजा करण्याचा बहुमान मिळाला.
शासकीय पूजेबाबत एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “यंदा राज्यात भीषण दुष्काळ असल्याने बळीराजा संकटात आहे. त्याच्या पाठीशी शासन आणि #शिवसेना देखील ठामपणे उभी असून त्याला दिलासा देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र तरीही यंदाच्या या संकटाची व्याप्ती पाहता ते दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळो एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितले.”
📍 #पंढरपूर | बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल, जीवभाव…|| #कार्तिकी_एकादशी निमित्त आज पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठ्ठलाची सहकुटुंब शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उचेगाव मधून आलेले सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या मानाच्या वारकऱ्यांसह ही पूजा करण्याचा बहुमान मला मिळाला. यंदा राज्यात भीषण दुष्काळ असल्याने बळीराजा संकटात आहे. त्याच्या पाठीशी शासन आणि #शिवसेना देखील ठामपणे उभी असून त्याला दिलासा देण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र तरीही यंदाच्या या संकटाची व्याप्ती पाहता ते दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळो एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितले. यावेळी माझी पत्नी लता शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सुन वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश शिंदे तसेच माझे सहकारी मंत्री आणि कुटुंबीय उपस्थित होते. #Pandharpur #KartikiEkadashi #Vithhal #Panduranga #VithhalRukmini #EknathShinde #Maharashtra
@DrSEShinde — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 21, 2026
Sanjay Raut : मोदींचा राजयोग संपला? संजय राऊतांचं मोठं भाकीत, एप्रिल-मे महिन्याचा दिला इशारा!
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सध्याच्या कठीण आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. संतांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून बळीराजाला धीर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, वारकरी संप्रदायाच्या विचारांतून शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाची शासकीय पूजा केली.
Ans: त्यांच्यासोबत पत्नी लता शिंदे, मुलगा तथा खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
Ans: पंढरपूरातील श्री विठ्ठलाची शासकीय पूजा ही धार्मिक आणि पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.






