Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनगर आरक्षणापासून सहकारातील गैरव्यवहारांपर्यंत; गोपीचंद पडळकरांचा सरकारला घेराव, सहकारातील कारभारावर गंभीर आरोप

Gopichand Padalkar on Dhangar ST Reservation: कवठेमहांकाळच्या आरेवाडी येथे हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर एसटी आरक्षण, सहकार क्षेत्रातील कथित गैरव्यवहार आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 08:52 PM
Gopichand Padalkar on Dhangar ST Reservation

Gopichand Padalkar on Dhangar ST Reservation

Follow Us
Follow Us:
  • आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला नवी दिशा देणार
  • पडळकरांचे समाजाला आवाहन
  • बसवेश्वर कॉरिडॉर आणि धार्मिक स्थळांच्या विकासाची मागणी
कवठेमहांकाळ : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणापासून सहकार क्षेत्रातील कथित गैरव्यवहारांपर्यंत आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनापासून धार्मिक स्थळांच्या विकासापर्यंत विविध मुद्द्यांना हात घालत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार आणि सहकार क्षेत्रातील कारभारावर जोरदार टीका केली. कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात आयोजित हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात ते बोलत होते. धनगर एसटी आरक्षणासाठी न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करतानाच, जिल्हा बँक शेतकरी सभासदांच्या हितासाठी काम करणारी असावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा विषय असल्याचे सांगत पडळकर म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने तातडीने आपले म्हणणे सादर करावे. न्यायालयीन निकाल प्रतिकूल लागल्यास पुढील लढ्याची तयारीही ठेवावी लागेल. यासाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात धनगर समाजातील तज्ज्ञ, अभ्यासक, बुद्धिवंत तरुण आणि ज्येष्ठांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत केवळ टीका न करता आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी ठोस कृती आराखडा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा बँकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कारभारावर टीका करत पडळकर यांनी शेतकरी सभासदांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा बँक ही शेतकरी सभासदांच्या पैशातून उभी राहिलेली संस्था असून, तिच्या कारभाराचा लाभ सामान्य शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. बड्या कर्जदारांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मिळतात. मात्र सामान्य शेतकऱ्यांना कर्जासाठी वारंवार बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात, असा आरोप त्यांनी केला.

बँकेतील नोकरभरतीत पैशांची मागणी झाल्याचा आरोप करत, भरती गुणवत्तेच्या आधारे व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या आरोपांबाबत संबंधित बँक प्रशासनाची भूमिका समोर आलेली नाही. बँकेतील कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १५ हजार रुपये करण्याची मागणी करतानाच, शिक्षणासाठी सांगलीत राहणाऱ्या शेतकरी सभासदांच्या मुलांना दरमहा एक हजार रुपये खोलीभाडे देण्याची योजना राबवावी, अशी संकल्पनाही त्यांनी मांडली.

यशवंतराव होळकरांच्या स्मारकासाठी पुढाकार

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात भव्य महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन पडळकर यांनी केले. यशवंतराव होळकर यांचा जन्म झालेल्या वाफगावच्या किल्ल्याचे संवर्धन राज्य सरकारने करावे, हा किल्ला खासगी संस्थेच्या ताब्यातून शासनाने स्वतःच्या ताब्यात घ्यावा आणि त्यासाठी स्वतंत्र किल्ले संवर्धन समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली.

किल्ल्यावर महाराजा यशवंतराव होळकर यांना साजेसे भव्य स्मारक उभारण्यात यावे, असेही ते म्हणाले. इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या वीर शिबग्रोबा धनगर यांचे नाव कनेक्टिंग लिंकला देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच विधानभवनाच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारावा आणि त्यांच्या नावाने आदर्श आमदार पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी केली.

धार्मिक स्थळांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना हवी

आरेवाडीच्या बिरोबा देवस्थानासह पट्टणकोडोली येथील यात्रा, वाशी येथील बिरोबा यात्रा आणि धुळोबा देवस्थानाच्या विकासासाठी पंढरपूरच्या यात्रेप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पडळकर यांनी केली.बिरोबा देवस्थान परिसराच्या विकासासाठी यापूर्वी सुमारे १४९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगून, त्यापैकी १०९ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचा दावा त्यांनी केला. देवस्थान परिसरात भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शासकीय यंत्रणेची व्यवस्था उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

पट्टणकोडोली येथील यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परांडे बाबांना यात्रेदरम्यान पोलीस संरक्षण आणि आवश्यक सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. बाळूमामा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायदा करून २१ सदस्यीय समिती स्थापन करावी. या समितीच्या अध्यक्षपदी मेंढपाळ समाजातील व्यक्ती असावी आणि समितीत मेंढपाळ समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असेही ते म्हणाले.

बसवेश्वर कॉरिडॉरची मागणी

महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात बसवेश्वर कॉरिडॉर विकसित करण्याची मागणीही पडळकर यांनी केली. विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने नियोजनबद्ध पावले उचलावीत, असे ते म्हणाले.मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांनी संघटित होऊन सहकारी संस्था, मजूर संस्था आणि प्रक्रिया उद्योग उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी केवळ राजकीय संघर्ष पुरेसा नसून आर्थिक संस्थांची उभारणीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहकार क्षेत्रातील कारभारावर पडळकरांचे गंभीर आरोप

  • जत साखर कारखाना : सभासदांनी उभारलेल्या कारखान्याच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित करत पडळकर यांनी कारखाना सुमारे ४० कोटी रुपयांत देण्याच्या कथित व्यवहाराबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली.
  • तासगाव, नागेवाडी कारखाने : सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीच्या व्यवहारांवर त्यांनी टीका केली.
  • मानगंगा कारखाना : आटपाडीतील मानगंगा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित जमिनीच्या व्यवहारावर आक्षेप घेतला.
  • जिल्हा बँक भरती : भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून २० ते ३० लाख रुपये घेतल्याचा आरोप करत गुणवत्तेच्या आधारे भरतीची मागणी केली.
  • शेतकरी हिताच्या योजना : बँकेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या मुलांना शिक्षणासाठी खोलीभाडे देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी केली. पडळकर यांनी जिल्हा बँक भरतीवर देखील गंभीर आरोप केले.

दुष्काळावर सरकारने काय करावे?

पडळकरांच्या भाषणात दुष्काळाचा तपशीलवार आढावा नसला, तरी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी हिताचे प्रश्न केंद्रस्थानी सांगली जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी भागांमध्ये शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी पुढील टंचाईग्रस्त गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा आणि आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था, चारा व्यवस्थापन, पीक नुकसानभरपाई, पाणी साठवण, मेंढपाळ आणि अन्य पशुपालकांच्या पाणी व चाऱ्याच्या गरजांसाठी विशेष नियोजन करा अशी मागणी केली.

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

Web Title: Gopichand padalkar dhangar on st reservation cooperative irregularities at hindu bahujan dussehra melava pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • Dhangar Reservation
  • gopichand padalkar
  • Kavthe Mahankal

संबंधित बातम्या

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
1

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Gopichand Padalkar : ‘बोल कमी, काम जास्त कर!’ चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना चॉकलेट देत सुनावलं
2

Gopichand Padalkar : ‘बोल कमी, काम जास्त कर!’ चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना चॉकलेट देत सुनावलं

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा
3

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?
4

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.