Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gopichand Padalkar : ‘बोल कमी, काम जास्त कर!’ चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना चॉकलेट देत सुनावलं

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने त्यांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट देऊन त्यांचं अभिनंदन करत 'बोल कमी आणि काम जास्त' असा मिश्कील सल्ला दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 07:27 PM
Chandrakant Patil on Gopichand Padalkar

Chandrakant Patil on Gopichand Padalkar

Follow Us
Follow Us:
  • गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
  • जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एन्ट्री
  • ‘चंद्रकांत पाटलांकडून चॉकलेट देत अभिनंदन
 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर पडळकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने त्यांचा निवडणुकीतील मार्ग मोकळा झाल्याचं वृत्त आहे. यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट देऊन पडळकरांचं अभिनंदन केलं.

पडळकरांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर सांगलीत राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मिश्कील टिप्पणी करत पडळकरांना कामावर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला.

ते म्हणाले, “पडळकर यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा घाबरतात. ते बँकेत आल्यावर काय होणार याची सगळी व्यूहरचना झाली आहे. कसलेला पैलवान जसा आठ ते दहा जणांना लोळवतो तसे ते आहेत. परंतु, पडळकर यां तू बोल कमी आणि काम जास्त कर असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र, पडळकरांनी उत्साह ठेवावा; उन्माद नको,” असा सल्लाही त्यांनी दिला.

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला

कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात धाव

सांगली जिल्हा बँकेच्या जत सोसायटी गटातून पडळकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या अर्जाच्या वैधतेवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर तो बाद करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानेही हा निर्णय कायम ठेवला होता.

त्यानंतर पडळकरांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली. आता सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

पडळकरांच्या अर्जावर आक्षेप काय होता?

पडळकरांच्या कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील सभासदत्वावर आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाच्या अनुभवावर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. जिल्हा बँकेच्या उपविधीनुसार ठरावीक कालावधीचं सभासदत्व आणि व्यवस्थापन समितीवरील अनुभव आवश्यक असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.

२० फेब्रुवारी २०२६ रोजी जमीन खरेदी केल्यानंतर त्याआधी सभासदत्व कसं मिळालं, तसेच पतसंस्थेतील सभासदत्व आणि संचालकपद निवडणुकीसाठी ग्राह्य धरता येईल का, असे प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले होते. या घडामोडींमुळे सांगली जिल्हा बँकेची निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणता दिलासा मिळाला?

    Ans: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

  • Que: चंद्रकांत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना काय सल्ला दिला?

    Ans: त्यांनी चॉकलेट देऊन पडळकरांचं अभिनंदन केलं आणि 'बोल कमी, काम जास्त' असा मिश्कील सल्ला दिला. 'उन्माद नको, उत्साह हवा' असंही ते म्हणाले.

  • Que: पडळकरांच्या उमेदवारी अर्जाला विरोध का करण्यात आला होता?

    Ans: कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील त्यांचं सभासदत्व आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाचा अनुभव यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक पात्रतेच्या निकषांवरून हा वाद निर्माण झाला.

Web Title: Gopichand padalkar supreme court relief sangli dcc bank election vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • gopichand padalkar
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा
1

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
2

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?
3

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद
4

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.