Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील 99% कुणबी दाखले बोगस, गोपीचंद पडळकरांचा आरोप; दिघंची गटातील उमेदवाराचे कागदपत्र केले सादर

राज्यातील तब्बल ९९ टक्के कुणबी जातीचे दाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी जोरदार खळबळ उडवून दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 04:49 PM
राज्यातील 99% कुणबी दाखले बोगस, गोपीचंद पडळकरांचा आरोप; दिघंची गटातील उमेदवाराचे कागदपत्र केले सादर

राज्यातील 99% कुणबी दाखले बोगस, गोपीचंद पडळकरांचा आरोप; दिघंची गटातील उमेदवाराचे कागदपत्र केले सादर

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ९९% कुणबी दाखले बोगस
  • गोपीचंद पडळकर यांचा आरोप
  • कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सांगली : राज्यातील तब्बल ९९ टक्के कुणबी जातीचे दाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप करत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी जोरदार खळबळ उडवून दिली आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवराज (पृथ्वीराज) तानाजी पाटील यांच्या कुणबी दाखल्यावरून वाद पेटला असून, सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतील विसंगतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उमेदवाराच्या कागदपत्रांनुसार त्यांच्या आजोबांनी तब्बल १३२ वर्षे आयुष्य जगल्याचा आणि ९८ व्या वर्षी मुलगा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे दावे नैसर्गिक नियमांना छेद देणारे असल्याने संबंधित दाखला बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सांगली जात पडताळणी समितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडींमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

“कुणबी दाखल्यांबाबत उघड झालेल्या विसंगती अत्यंत गंभीर असून, याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. बनावट दाखल्यांमुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होतो. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,” – आमदार गोपीचंद पडळकर

‘कुणबी’ दाखला वादात ३० लाखांच्या लाचेचा आरोप; समित्यांवर भ्रष्टाचाराचे सावट

सांगली जिल्हा परिषद सदस्य शिवराज (पृथ्वीराज) तानाजी पाटील यांच्या ‘कुणबी’ दाखल्याच्या वादात ३० लाख रुपयांच्या लाचेचा अत्यंत गंभीर आरोप पुढे आला आहे. याप्रकरणी पडळकर म्हणाले, सांगली जात पडताळणी समितीकडून पराभूत उमेदवाराला निरोप पाठवून संबंधित दाखला तत्काळ रद्द करण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित उमेदवाराने ही मागणी फेटाळून लावली, या घटनेमुळे जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे दाखला देणे आणि त्यानंतर तो रद्द करण्यासाठी पैशांची मागणी करणे, अशी दुहेरी भूमिका घेतली जात आहे. महाराष्ट्रातील जात पडताळणी समित्या या ‘भ्रष्टाचाराचा अड्डा’ बनल्या आहेत, सर्वसामान्य नागरिकांकडून पैशांची मागणी होत असून, त्यांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचेही पडळकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अभय योजनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद; 29 दिवसांत 157 कोटींची विक्रमी वसुली

Web Title: Gopichand padalkar has alleged that many kunbi certificates in the state are bogus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • gopichand padalkar
  • sangli news

संबंधित बातम्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
1

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
2

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू होणार? बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मावळात नव्या संघर्षाची चिन्हे
3

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू होणार? बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मावळात नव्या संघर्षाची चिन्हे

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…
4

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.