Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळसा वाहतुकीसाठी GPS अनिवार्य; प्रदूषण रोखण्यासाठी ‘चंद्रपूर मॉडेल’; शंभूराज देसाई यांची माहिती

आतापर्यंत ५०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोळसा वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, जीपीएसद्वारे वाहनांचा संपूर्ण प्रवास नोंदवला जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2026 | 12:13 PM
Shambhuraj Desai

Shambhuraj Desai

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि आसपासच्या भागात कोळसा वाहतुकीमुळे वाढणारे प्रदूषण तसेच अपघातांची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष उपाययोजना करणार आहे. यासाठी कोळसा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवणे अनिवार्य करण्यात येणार असून, या संकल्पनेवर आधारित ‘चंद्रपूर मॉडेल’ तयार करण्यात येईल, अशी माहिती उत्पादन शुल्क व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे परिसरात वाढणारे प्रदूषण आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ट्रक चालकांविरोधात आमदार उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कोळसा वाहतुकीदरम्यान उघड्यावर कोळसा नेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, शेतीचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सांगितले की, कोळसा वाहतुकीसाठी लवकरच ठोस कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार आहे. ताडपत्री न वापरता कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस आणि आरटीओकडून कारवाई सुरू आहे.

हे देखील वाचा : दिलासादायक ! युद्धादरम्यानचं तेल संकट आता लवकरच दूर होईल; 32 देशांनी उघडले आपात्कालीन साठे

दरम्यान, आतापर्यंत ५०० हून अधिक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोळसा वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, जीपीएसद्वारे वाहनांचा संपूर्ण प्रवास नोंदवला जाईल. तसेच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अधिवेशनानंतर पर्यावरण, गृह आणि परिवहन विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार खापरेंच्या प्रश्नावर मंत्र्यांची माहिती

याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर मंत्री देसाई यांनी हा निर्णय जाहीर केला.

हेदेखील वाचा : Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

Web Title: Gps made mandatory for coal transport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! तब्बल 45988 नावे रेशन कार्डवरून वगळली; राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम सुरु
1

मोठी बातमी ! तब्बल 45988 नावे रेशन कार्डवरून वगळली; राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम सुरु

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी
2

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन
3

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन

निसर्गप्रेमींनो डोळस व्हा! सर्वांचं खास आकर्षण असणारं कास होतंय भकास, पर्यावरण वाचवण्याची गरज
4

निसर्गप्रेमींनो डोळस व्हा! सर्वांचं खास आकर्षण असणारं कास होतंय भकास, पर्यावरण वाचवण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.