Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास 'हे' मार्ग असतील शेवटचा आधार (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
होर्मुझचा सागरी मार्ग पर्शियन आणि ओमानच्या सागरी मार्गांना जोडणारा एकमेवर मार्ग आह. जगातील एकूण कच्चा तेलाच्या व्यापारापैकी २० ते ३० टक्के तेल व्यापार या मार्गावरुन केला जातो. सौदी अरेबिया(Saudi Arabia), इराण, इराक, कुवैत आणि UAE यांसारखे मोठे तेल उत्पादक देश या मार्गावरुन जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा करतात.
होर्मुझचा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरात महागाईचा भडका उडू शकतो. सध्या युद्ध सुरु झाल्यापासून पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्चा तेलाची किंमत २४% वाढली आहे. बेंट क्रूड प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढण्याची भिती आहे.
सध्या होमुर्झला पर्यायी म्हणून काही मार्गांचा विचार केला जात आहे. परंतु त्याची क्षमता मर्यादित आहेत.






