Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: २९ गावं… २९ शौर्यगाथा! शहीदांच्या स्मरणासाठी उभा राहतोय ‘जळगाव पॅटर्न’

Jalgaon News: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये शहीद स्मारके उभारण्यात येणार आहेत. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त झालेल्या भूमिपूजन व कृतज्ञता सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहीद कुटुंबीयांचा सन्मान केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 10, 2026 | 11:45 AM
Jalgaon News: २९ गावं… २९ शौर्यगाथा!(फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: २९ गावं… २९ शौर्यगाथा!(फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • २९ गावांत शहीद स्मारके उभारणार
  • वीर माता, पिता व पत्नींचा सन्मान
  • स्मारके तरुणांसाठी प्रेरणाकेंद्रे ठरणार
Jalgaon Pattern:  देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या स्मृती जपणे आणि भावी पिढीला त्यांच्या शौर्याची प्रेरणा देणे हीच खरी मानवंदना आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृहात शहीद स्मारक भूमिपूजन व कृतज्ञता सोहळा तसेच बीर माता, वीर पिता व वीर पत्नी सन्मान सोहळा झाला. यावेळी जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले. शहीद कुटुंबीयांचा शाल व तिरंगा हार देऊन सन्मान करण्यात आला.

पालकमंत्री नेमकं काय म्हणाले?

पोलिस बँडच्या संचलनात वीर माता, पिता व पत्नी यांना अग्रस्थान देण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. २९ गावांतून आणलेली माती एकत्र करून भूमिपूजन करण्यात आले. ही स्मारके केवळ वास्तू न राहता विद्यार्थ्यांना व तरुणांना देशसेवेची प्रेरणा देणारी केंद्रे ठरतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. स्मारकांच्या देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.Jalgaon News:

Jalgaon News: जळगावकरांनी सावध राहा! आज जिल्ह्यात वादळी पावसाची …

देश कुटुंबीयांच्या पाठिशी

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शहीदांच्या इतिहासातून नव्या पिढीत राष्ट्रभक्ती व देशसेवेची भावना रुजेल, असे सांगितले. आमदार सुरेश भोळे यांनी शासन शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव परिसरातील शहीद जवानांच्या योगदानाचा उल्लेख केला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी २९ ठिकाणी स्मारके उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला. परिवर्तन संस्थेचे प्रमुख शंभू पाटील यांनी शहीदांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी …

माहितीपटातून दिला शौर्यगाथेला उजाळा

कार्यक्रमात जिल्ह्यातील ३२ शहीद जवानांच्या शौयगाथेवरील माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी सभागृह भावूक झाले. आयुक्त आदित्य जीवने, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, कर्नल मल्होत्रा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक विश्वनाथ उगले, मारोती घुगे, समाधान धनगर, रतिलाल महाजन, विनायक महाजन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शहीद कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

Web Title: Jalgaon to build martyrs memorials in 29 villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Gulabrao Patil
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
1

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी
2

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

Satara : यशवंत टाकीच्या पाणीगळतीने नगरपरिषदेचा ठेकेदारावर बडगा मध्यरात्री टाकी ओसंडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; २५ हजारांचा दंड,
3

Satara : यशवंत टाकीच्या पाणीगळतीने नगरपरिषदेचा ठेकेदारावर बडगा मध्यरात्री टाकी ओसंडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय; २५ हजारांचा दंड,

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार
4

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ‘एआरपी’ प्रणालीला मंजुरी; कामगार सेनेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.