Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात महिलाशक्तीचा जागर! शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर आणि ‘होम मिनिस्टर’ सोहळा उत्साहात

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून अशा महिलांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 06, 2026 | 05:09 PM
महिलांचा सन्मान करताना ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर...

महिलांचा सन्मान करताना ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर...

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात महिलाशक्तीचा जागर!
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर आणि ‘होम मिनिस्टर’ सोहळा उत्साहात
सातारा दि ६ (प्रतिनिधी): आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. चूल- मूल, संसार याबरोबरच स्त्री नोकरी, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. ही अभिमानाची बाब असून प्रत्येक महिलेने सक्षम झाले पाहिजे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असून अशा महिलांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

शेंद्रे ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने सातारा तालुक्यातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, होम मिनिस्टर हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देताना ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी आ. मनोज घोरपडे, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य अजित साळुंखे, सर्जेराव सावंत, पूजा मोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, उप सभापती सुषमा जाधव, सदस्य कोमल दळवी, प्रमिला सुतार, विजया साळुंखे, मानसिंग मोरे, प्रभाकर पवार, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, डॉ. दीपक थोरात, सातारा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. विनायक काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Satara News : खेळाडूंसाठी क्रीडांगण देता का क्रीडांगण…! चार मंत्री असेलल्या जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राची शोकांतिका

महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, दंतरोग, त्वचारोग, नेत्र तपासणी, असंसर्गजन्य रोग तपासणी यासह विविध आजाराच्या तपासण्या करण्यात आल्या. याशिबिराचा लाभ सुमारे १५०० महिलांनी घेतला. याप्रसंगी अनेक महिलांनी रक्तदान केले. शिबिरात डॉ. स्नेहांजली महामुनी, डॉ. आशा बर्गे, डॉ. दीप्ती पवार, डॉ. अश्विनी सोनवलकर, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. रसिका गोखले, डॉ. राजश्री ठोके, डॉ. अपर्णा जगताप आदी तज्ञांनी विविध आजार, उपचार याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आरोग्य शिबीर व महिला सन्मान सोहळ्याला हजारो महिला उपस्थित होत्या. या महिलांच्या मनोरंजनासाठी अभिनेते ओम यादव यांचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने उपस्थित महिलांची मने जिंकली. या कार्यक्रमतील विजेत्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता- भगिनींचा ना. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Satara ZP Election : साताऱ्यात राजकारण तापलं; सभापती निवडणूकीवरुन महायुतीत वाद

Web Title: Grand health camp and home minister event organized with great enthusiasm on behalf of shivendrasinhraje bhosale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Satara News
  • Shivendrasinharaje Bhosale
  • Womens

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.