Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Maharashtra Politics: महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (११ ऑक्टोबर) महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 12, 2026 | 03:41 PM
महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर!
  • फडणवीसांच्या बैठकीला शिंदे-सुनेत्रा पवारांची दांडी
  • महायुतीत नाराजीनाट्य?
Maharashtra Politics: महाराष्ट्रात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (११ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून विविध उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

Alphanso वर ‘अल निनो’चा सर्जिकल स्ट्राइक! कोकणच्या ‘राजा’ची अवस्था बिकट, बागायतदार चिंतेत

या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील उपस्थित होते. तसेच केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल आणि पथकातील इतर सदस्यही बैठकीला उपस्थित होते. बैठकीत राज्यातील दुष्काळाची तीव्रता, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि मदतीसंदर्भातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर बैठक होत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर का होते, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोघांनाही या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते का, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते किंवा नव्हते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागांची पाहणी

राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र सरकारने ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्रात पाठवले होते. या पथकाने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. पथकाच्या पाहणीत सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. काही भागांमध्ये पिकांचे उत्पादन जवळपास शून्यावर आल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि जलसाठ्यांची घटती पातळी याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.

केंद्राकडे १७,५०० कोटींच्या मदतीची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे १७ हजार ५०० कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीचा प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर राज्य सरकार अधिक तपशीलवार प्रस्ताव सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत पुढील निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह?

दुष्काळासारख्या गंभीर विषयावरील बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्याने महायुती सरकारमधील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते किंवा ते नाराज आहेत, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीवरून महायुतीत मतभेद असल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडले असताना दुसरीकडे या बैठकीतील राजकीय अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय किंवा संबंधित उपमुख्यमंत्र्यांकडून याबाबत काही स्पष्टीकरण दिले जाते का, याकडे लक्ष लागले आहे.

Satara Sugarcane Protest News: ऊस परिषदेतील दर मिळेपर्यंत माघार नाही!; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Web Title: Maharashtra drought review meeting devendra fadnavis eknath shinde sunetra pawar absence political controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
1

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक
2

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
3

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
4

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.