Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: कोरेगावच्या राजकारणात खळबळ! शिवसेना जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांचा आमदार महेश शिंदेंवर निशाणा

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पदाधिकाऱ्यांना डावलण्याच्या कार्यपद्धतीमुळे कोरेगावमध्ये राजकीय वाद उफाळून आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 04, 2026 | 09:03 PM
कोरेगावच्या राजकारणात खळबळ!

कोरेगावच्या राजकारणात खळबळ!

Follow Us
Follow Us:

 

  • कोरेगावच्या राजकारणात खळबळ!
  • शिवसेना जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांचा आमदार महेश शिंदेंवर निशाणा
सातारा / प्रतिनिधी: शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोरेगाव मतदारसंघातील राजकारणात नवी खळबळ उडवली आहे. “वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याऐवजी त्यांना डावलण्याची पद्धत सुरू आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

जगदाळे यांनी स्पष्ट केले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी पक्षांतर्गत जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. त्या प्रयत्नांमुळेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आणि त्यातूनच महेश शिंदे यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.

ते पुढे म्हणाले की, “खटाव, कोरेगाव आणि सातारा या भागात फिरताना आम्ही वास्तव परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती. मात्र सध्या सुरू असलेली चर्चा ही त्या वास्तवाशी सुसंगत नाही.” २०२९ च्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सूचक इशारा दिला की, “पक्षाने जो निर्णय घेईल त्यानुसार काम करावे लागेल,” असे सांगितले जात असले तरी सध्याच्या घडीला आमदार महेश शिंदे यांचे राजकीय पारडे जड असल्याचेही त्यांनी मान्य केले.

Javali Khair Tree Cutting: जावळीत दुर्मिळ खैर वृक्षांची राजरोस कत्तल; वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष? वृक्षप्रेमींमधून संताप

गावागावात शिंदे यांचा संपर्क मजबूत असल्याचे नमूद करत जगदाळे म्हणाले, “१२ हजार मतदार असलेल्या गावातही ते कौटुंबिक जिव्हाळा टिकवून ठेवतात.” मात्र याचवेळी त्यांनी वरिष्ठांकडून स्थानिक पातळीवरील वास्तवाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “निवडणुका झाल्या, पण त्यामधील वास्तव वेगळेच होते.”

आपली भूमिका स्पष्ट करत जगदाळे म्हणाले, “माझा कोणावरही वैयक्तिक आरोप नाही आणि मला कोणत्याही पदाची अपेक्षाही नाही. मात्र लोकांसमोर खरी परिस्थिती मांडणे हे आमचे कर्तव्य आहे.” या वक्तव्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satara: तासवडे टोलनाक्यावर संतापाचा स्फोट; माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन, प्रशासनाला इशारा

Web Title: Haridas jagdale criticizes mla mahesh shinde koregaon politics satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Maharashtra Politics news
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.