
उसाचा हंगाम १५ मार्चपर्यंत संपण्याचा अंदाज
इथेनॉलचा कोटा ६० कोटीने वाढवण्याची मागणी
इथेनॉल योजनेची मुहुर्तमेढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी
पुणे: महाराष्ट्रातील कारखान्यांनी दैनंदिन गाळप क्षमतेत केलेली मोठी वाढ आणि ऊस तोडीत केन हार्वेस्टरचा वाढलेला वापर यामुळे यंदाचा हंगाम फेब्रुवारी अखेर किंवा जास्तीत जास्त १५ मार्चपर्यंत संपण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्याकडे मळी पडून असून, केंद्रसरकारकडे इथेनॉलचा कोट्याची म्हणजे ६० कोटी ने वाढवून द्यावा ही प्रमुख मागीणी आम्ही केली आहे जी मळी पडून आहे तीची प्रक्रिया होईल. त्यातून मार्ग निघेल अशी माहीती पत्रकार परिषदे मध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्याक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, वास्तविक पाहता इथेनॉल योजनेची मुहुर्तमेढ देशभरातील ५ कोटी अल्प भूधारक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. सुरुवातीपासून एकूण इथेनॉल पुरवठ्यामध्ये साखर उद्योगाचा असलेला ९० टक्के वाटा आजच्या घडीला २८ टक्केच उरला आहे. कारण तेल कंपन्यांनी इथेनॉल पुरवठ्याचे आवंटन (अलोकेशन) धान्य इथेनॉलला प्राधान्यतेने (७२ टक्के) करण्याचे अवलंबले आहे.
त्यामुळे इथेनॉल निर्मितीची ६०० कोटी लिटर्सची क्षमता आज पडून आहे आणि त्यात झालेली गुंतवणुक व त्यावरील व्याजाच्या बोज्यासाठी साखर उद्योग दबला गेला आहे. त्यातच इथेनॉलच्या खरेदी दरात गेल्या तीन वर्षापासून वाढ झालेली नाही.
Indian Sugar Industry: साखर उद्योग आर्थिक संकटात; साखर दर घसरण आणि इथेनॉल दरवाढीचा अभाव कारणीभूत
दुसरीकडे साखरेच्या किमान विक्री दरात (Sugar MSP) गेल्या सहा वर्षात वाढ झालेली नाही. या सहा वर्षात कच्चा मालाच्या (ऊस) दरात मात्र २६ टक्के वाढ झालेली आहे. या दुहेरी संकटाच्या गर्तेत अडकलेल्या देशभरातील साखर उद्योगाच्या व्यथा आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमीत शहा, केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, यांना निवेदने दिली असून त्यांच्या समक्ष भेटीची वेळ मागितली आहे.
देशाचे साखर आणि जैव ऊर्जा क्षेत्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतुन जात आहे. यात हस्तक्षप, सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय ताबडतोबीने न झाल्यास त्याचे अत्यंत विपरीत आणि दुरगामी परिणाम होण्याची साधार भीती आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास कोट्यावधी अल्प भूधारक ऊस उत्पादक शेतकरी ऊस थकबाकीच्या ओझ्याखाली दबू शकतात आणि त्याच्या परिणामस्वरुप धोरण कर्त्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आकडेवारी – २०२५-२६ – २०२४-२५- फरक
गाळप घेतलेले कारखाने ४५४- ४५७ – -३
ऊसाचे गाळप ( लाख टन ) २४२० – २१७७ – + २४३
नवे साखर ऊपादन ( लाख टन ) २२५ – १९८ – + २७
सरासरी साखर उतार ( टक्के ) ९.३१ – ९.०९ – +०.२२
ग्रेनस्पॅनचे इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठे पाऊल, ५२० कोटींची गुंतवणूक
इथेनॉल पुरवठ्या बाबतची १५ फेब्रुवारी अखेरची परिस्थिती
इथेनॉल वर्ष २०२५-२६ ( नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६)
१) इथेनॉल पुरवठादारांची ऑफर – १७७६ कोटी लिटर
२) तेल कंपन्यानकडूनची मागणी निश्चिती -१०४८ कोटी लिटर
१. धान्य इथेनॉल पुरवठा – ७५९ कोटी लिटर ( ७२ टक्के )
२. साखर उधोग इथेनॉल पुरठा – २८९ कोटी लिटर ( २८ टक्के )
३) आजतागायत झालेला पुरवठा – २४० कोटी लिटर
१. धान्य इथेनॉल पुरवठा – १५१ कोटी लिटर ( ६३ टक्के )
२. मळी इथेनॉल पुरवठा – ८८ कोटी लिटर ( ३७ टक्के )
४) साखरेचा इथेनॉलसाठी वापर १२ लाख टन
५) सरासरी इथेनॉल पेट्रोल मिश्रण १९.९८ टक्के