Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 10, 2026 | 12:30 AM
जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

Follow Us
Follow Us:
  • जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला
  • निकालावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रीया
  • विमान अपघातावरील संशय दूर करण्याची मागणी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, २०१९ साली राज्यातील एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन करण्यात आले होते, त्यानंतर २०२४ च्या विधानसभा मविआ म्हणून लढलो तर लोकसभेसाठी देशभरात भाजपाविरोधात संविधानवादी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली, पण स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत मात्र अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो. वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी व रासप हे नवे मित्रपक्ष काँग्रेस पक्षाने जोडले. या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेस ठरला आहे. २०२९ ला अद्याप वेळ आहे, त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे सपकाळ म्हणाले.

चंद्रपूर महानगरपालिकेसंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडे ३२ चा आकडा आहे व २ सदस्यांची गरज आहे. चंद्रपुरात शिवसेना (उबाठा), वंचित बहुजन आघाडीने गट स्थापन केला आहे, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरु असून उबाठा बरोबर चर्चा झालेली आहे व तसा प्रस्ताव दिलेला आहे. परभणी महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) ला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे आणि जे होईल ते दोन्ही ठिकाणी होईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

विमान अपघातावरील संशय दूर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूने अनेकांच्या मनात आजही संशय आहे. अपघाताला १० दिवस झाले तरी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत, त्यामुळे संशय बळावणे स्वाभाविक आहे. दृष्यमानता नसल्याने विमान अपघात झाल्याचे सांगितले जात होते पण त्यानंतर अनेक बाबी समोर येत आहेत पण मुख्यमंत्री फडणवीस या अपघाताकडे गांभिर्याने पहात नाहीत असे दिसते, असे सपकाळ म्हणाले.

मोहोळमध्ये धाब्यावर ईव्हीएम

जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याचे सर्वांनी पाहिले पण अशा किती मशीन मंत्र्यांच्या, सत्ताधारी नेत्यांच्या घरी आढळल्या याची माहिती घ्या. या निवडणुकीतही अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनच्या तक्रारी आल्या आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपाचे माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपाला संघाची आवश्यकता नाही असे म्हटले होते, त्याला भागवत यांनी प्रत्तुत्तर दिले असेल. कोणाला, कोणाची गरज आहे हे भाजपा व रा. स्व. संघाने आपसात ठरवावे, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

सीटीईटी परिक्षेवेळी परिक्षार्थींना मंगळसुत्र काढण्यास लावणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला असून एकावे तेच नवलच आहे. कॅापीचा व मंगळसुत्राचा काय संबंध आहे, असा प्रश्न उपस्थित करून भाजपा सरकार आता धर्मबुडवेपणा करायला लागले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal has reacted to the results of zp and panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
1

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
3

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी मार्गदर्शन करणार
4

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर; राहुल गांधी मार्गदर्शन करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.