Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला धक्का बसला असून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 08:47 PM
eknath shinde

eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवक शिवसेनेत दाखल
    बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षप्रवेश
    दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
 

अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र सुरू असतानाच विदर्भात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेतील 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.

याशिवाय अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांचे सहकारी तसेच प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष आणि कर्नाटकातील बेळगाव येथील विविध पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

दर्यापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

मुंबईतील नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसची राजकीय ताकद कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले आहे.

‘अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या’; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, ‘शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी

“दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही”

पक्षात दाखल झालेल्या नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. दर्यापूरच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाला महायुती सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे कौतुक केले. शेतकरी, दिव्यांग, वंचित आणि सर्वसामान्य घटकांसाठी कडू यांनी केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार

विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला या पक्षप्रवेशामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू, आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

‘गोरे बाईंच्या नावात ‘नि’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते’; सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला

Web Title: Vidarbha congress setback daryapur municipal president 19 councillors join shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • amravati
  • Congress
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
2

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
3

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.