Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे, अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. तसेच सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 04:00 PM
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी सपकाळांची मागणी

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी सपकाळांची मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व संताप आणणारी आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयात असाच प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णलयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, कशा प्रकारे फायर ऑडिट करण्यात आले. या जळीत कांडांशी संबधितांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला, ते म्हणाले की, एकीकडे गर्भपात करू नये यासाठी अभियान राबविले जाते तर दुसरीकडे नवजात बालके जळून मृत्यू पावतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात सरकार, प्रशासन, कायद्याचा धाक कुठेच अस्तित्वात राहिलेला नाही. केवळ दंडेलशाही आणि सत्तेची मस्ती सुरु आहे. राज्याचा आरोग्य मंत्री कोण हे महाराष्ट्राला माहित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त मोठ्या गप्पा मारतात. अमरातीतील जळीत कांडात नवजात बालकांचा जळून मृत्यू झाला हे पाप भाजपा सरकारचेच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन प्रायश्चित घेतले पाहिजे.

सणासुदीत साखर महाग

राज्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि सारखचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. ४० रुपये किलोची साखर अचानक ८० रुपयावर गेली व १०० रुपयांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महागाईस भाजपा सरकारची धोरणेच जबाबदार आहेत. सरकारचे महागाईवर नियंत्रण नाही, मुठभर उद्योगपतींचे भले करणे हेच भाजपा सरकारचे काम आहे. सामान्य जनतेला महागाईचा फटका बसतोय त्याचे सरकारला काहीही पडलेले नाही. ६० रुपयांचे पेट्रोल ११० रुपये झाले, ४५० रुपयांचा सिलेंडर १ हजारावर गेला आहे, त्याप्रमाणे साखरही महागली आहे पण सरकार मात्र झोपेतच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांची बेताल वक्तव्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलघेवडे म्हणायचे असेल पण त्यांनी राहुल गांधींचे नाव घेतले. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी उभारणार हे नरेंद्र मोदी म्हणाले होते. म्हणजे बोलघेवडेपणा तर मोदी यांनी केला. उलट राहुल गांधी यांनी कोरोनाचे संकट, नोटबंदीमुळे देशाचे होणारे आर्थिक नुकसान, ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेच्या दबावासमोर मोदी सरकार झुकले हे सांगितले होते व काळाच्या कसोटीवर ते तंतोतंत खरे ठरले आहे पण फडणवीस यांनी ‘वड्याचे तेल वांग्यावर काढले’. वास्तविक पाहता राहुल गांधी यांचा पुण्यातील कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. भाडोत्री कार्यकर्त्यांकडून हिंसा पसरवण्याचा भाजपाने प्रयत्न केला. तरीही कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकारली आहे म्हणून फडणवीस बेताल वक्तव्ये करत आहेत. पैसे देऊन गर्दी केल्याची चौकशी करु असे त्यांनी म्हटले आहे तर त्यांनी खुशाल चौकशी करावी सरकार त्यांचेच आहे, असे सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

फडणवीसांनी विद्यार्थिनींची माफी मागावी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या विद्यार्थीनींसाठी विशेष कार्यक्रमास केवळ पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पैसे देऊन विद्यार्थिनींची गर्दी केली’ असा बिनबुडाचा विषारी आरोप करून सावित्रींच्या लेकींचा घोर अपमान केला आहे. मुलींचा अपमान करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Harshvardhan sapkal has responded to the incident at the amravati district womens hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • amravati
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnvis यांचा मोठा निर्णय, सरकारी खर्चात 20% कपात, लाडकी बहीण योजनेलाही धक्का?
1

CM Devendra Fadnvis यांचा मोठा निर्णय, सरकारी खर्चात 20% कपात, लाडकी बहीण योजनेलाही धक्का?

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल
2

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!
3

Amravati News: शिक्षक मतदारसंघात महायुतीत ठिणगी; किरण सरनाईकांविरुद्ध डॉ संगीता शिंदे यांचे बंड!

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
4

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.