Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

Amravati Hospital Fire: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन रुग्णालय) NICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. बचाव पथकाने वेळीच हालचाल करत ३६ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2026 | 01:24 PM
अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

Follow Us
Follow Us:
  • NICU मध्ये भीषण आग
  • ३ चिमुकल्यांचा मृत्यू; ३६ नवजात बालकांना वाचवले
  • उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
Amravati Hospital Fire: अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय (Amravati Hospital Fire) अर्थात डफरीन रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

NICU मध्ये भीषण आग; तीन नवजात बालकांचा मृत्यू

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU मध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट आणि वाढत्या उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर बनली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. NICU मध्ये उपचार घेत असलेल्या बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

Amravati Hospital Fire: अंगावर काटा! व्हेंटिलेटरचा स्फोट, ३ नवजात बाळांचा मृत्यू; बाळांच्या कक्षात आग

३६ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले

या दुर्घटनेत बचाव पथकाच्या तत्परतेमुळे ३६ नवजात बालकांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आगीचा विस्तार होण्यापूर्वीच या बालकांना NICU मधून बाहेर काढून अन्य सुरक्षित वार्ड किंवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. बचावण्यात आलेल्या बालकांवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीची सातत्याने तपासणी केली जात आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुर्घटनेत बाधित झालेल्या अन्य नवजात बालकांवर आवश्यक ते सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत आणि उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारने करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशीष येरकर यांना दिल्या आहेत.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

ही आग नेमकी कशामुळे लागली, रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, NICU मधील विद्युत आणि अन्य उपकरणांची देखभाल नियमानुसार केली जात होती का, यासह विविध बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य प्रशासनाला घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीत अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2026

आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव अमरावतीकडे रवाना

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव यांना अमरावती येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील परिस्थिती, बचावकार्य, बालकांवरील उपचार आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. या दुर्घटनेनंतर सरकारी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः NICU सारख्या अतिसंवेदनशील विभागांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग आणि उपकरणांची नियमित तपासणी किती काटेकोरपणे केली जाते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तीन नवजात बालकांचा जीव घेणाऱ्या या दुर्घटनेचे नेमके कारण उच्चस्तरीय चौकशीनंतर स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

Web Title: Amravati dufferin hospital nicu fire three newborns dead cm fadnavis announces rs 5 lakh aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • amravati
  • Fire
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.