Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे हटणार नाही, हे भाजपा सरकारने लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 03:03 PM
तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे हटणार नाही, हे भाजपा सरकारने लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आहे, ती वाचवण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे देशासमोरील ज्वलंत प्रश्न आहेत. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आरोप केलेले असतांना त्यावर ज्ञानेशकुमार का बोलत नाहीत, यावर भाजपाने बोलावे, मुळ मुद्द्याला बगल देत नेहमीचेच हिंदु-मुस्लीम, भारत-पाकिस्तानचे तुणतुणे वाजवणे बंद करा. सरकार दडपशाही करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करेल तर त्याची मोठी किंमत भाजपाला सरकारलाच मोजावी लागेल, असेही सपकाळ म्हणाले.

शिवाजी पार्कवरील आंदोलनाबरोबरच नाशिकपासून मुंबईकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉंग मार्च निघाला आहे तर पुण्यात MPSC विरोधात लाखो तरुण विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या तिन्ही घटना भाजपा सरकारच्या गलथान कारभाराचे वाभोडे काढणाऱ्या आहेत. MPSC च्या अध्यक्षांची हकालपट्टी करावी ही विद्यार्थ्यांची मागणी असताना मुख्यमंत्री मात्र हात झटकत आहेत कारण या पदावरील अध्यक्ष भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यासारखे वागावे, तो मी नव्हेच असा पवित्रा घेऊ नये असे सपकाळ म्हणाले.

पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी पॅकेज घेऊन येतील !!.

राज्यातील दुष्काळी दौऱ्याच्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत असे समजते, राज्यात मोठा दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येताना शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन येतील व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत देतील, अशी अपेक्षा करुया असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मविआत कोणतीही नाराजी नाही

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीवरून मविआत कोणतीही नाराजी नाही. ५ जागांपैकी २ ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. अमरावतीत काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे, इतर दोन जागांवर चर्चा सुरु आहे. ही निवडणूक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची आहे, आम्ही एकच असून आमच्या भूमिका परस्पर पूरक असतील, कोणताही तिढा नाही, समन्वय व्यापक करण्यासाठी बैठक होत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

साहिल वाकोडेच्या कुटुंबियांनी घेतली डॉ. प्रसाद व सपकाळांची भेट

जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या IIT बॅाम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची शांता आश्रम येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, यु.बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के आदी उपस्थित होते.

Web Title: Harshvardhan sapkal has warned the government regarding issues concerning the youth nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच
1

Rahul Gandhi Launch Satyagrah Manch: देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर! राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
2

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

उजनीतील एआय कॅम्पस, डेटा सेंटर व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या पाणीवापराची माहिती द्या; खासदार मोहिते पाटलांची मागणी
3

उजनीतील एआय कॅम्पस, डेटा सेंटर व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या पाणीवापराची माहिती द्या; खासदार मोहिते पाटलांची मागणी

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!
4

Graduate Election : मुख्यमंत्री फडणवीस-शरद लाड भेटीने पुणे पदवीधरची चर्चा तापली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.