Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी

कराड येथील शासकीय विश्रामगृहात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलातील विविध प्रलंबित विकासकामांचा पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2026 | 11:06 AM
कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी

कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी

Follow Us
Follow Us:

कराड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही तो वाहतुकीसाठी खुला करण्याची घाई करण्यात आली. पुलावरील पथदिव्यांची प्रकाशयोजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही, तसेच काही कामे प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम पूर्ण झाल्याचा अधिकृत हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला करणे योग्य ठरले असते, अशी स्पष्ट नाराजी पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलातील विविध प्रलंबित विकासकामांचा पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कराडच्या उड्डाणपुलासह राष्ट्रीय महामार्गावरील विविध प्रश्नांवर भूमिका मांडली.

कराड परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, सेवा रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. महामार्ग प्राधिकरणाला दुरुस्तीसाठी सुधारित कालमर्यादा देण्यात आली असून, या मुदतीत संबंधित कामे पूर्ण केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

सुपने मंडलातील विविध प्रलंबित विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून, कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. मंडलातील सरासरी ७५ टक्के विकासकामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा नियोजन समिती, डोंगरी विकास, पर्यटन, तसेच अन्य विभागांमार्फत यावर्षी प्रस्तावित असलेल्या कामांची यादी १५ ऑगस्टपर्यंत मागविण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर प्रलंबित कामांना तातडीने सुरुवात करून ती मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुपने मंडलाला अधिक विकासकामे मिळावीत, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

दर्जाहीन कामे नव्या कंपनीकडून

कराड-चिपळूण महामार्गाच्या कामाबाबतही नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहे, यावर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले की, काही ठिकाणी कामाचा दर्जा अपेक्षित पातळीचा नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणची कामे नव्या कंपनी आणि ठेकेदारामार्फत पूर्ण करून घेतली असून, उर्वरित कामेही दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.

निधी वाटपात प्रशासनाने तटस्थ राहावे

कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत सेस फंडाच्या वाटपावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये वादावादी झाल्याची माहिती आपल्या सदस्यांकडून मिळाली आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांनी सत्ताधारी आणि विरोधक असा कोणताही भेदभाव न करता निधी वाटपात समतोल साधला पाहिजे. जिल्हा परिषदेत निधी वाटप करताना समानता राखावी लागते. अध्यक्ष व उपाध्यक्षांना पाच टक्के निधीच्या वापराचे अधिकार असतात. मात्र अन्य बाबतीत अधिकाऱ्यांनी समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी वाटप करताना प्रशासनाने तटस्थ राहावे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Haste to open the karad flyover despite incomplete work guardian minister shambhuraj desai displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
1

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
2

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
3

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
4

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.