Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेव जानकर यांची ऐकला चलोची हाक; रासप’ची जन स्वराज्य यात्रा बारामती लोकसभा मतदारसंघात

माझा स्वतंत्र पक्ष असून, मी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, युती न करता देशातील आगामी सर्व लोकसभा आणि महाराष्ट्रातील सर्व विधानसभेच्या जागा पूर्ण ताकतीने लढवणार आणि ती जिंकून आणणार, असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2023 | 06:33 AM
महादेव जानकर यांची ऐकला चलोची हाक; रासप’ची जन स्वराज्य यात्रा बारामती लोकसभा मतदारसंघात
Follow Us
Follow Us:

पाटस : माझा स्वतंत्र पक्ष असून, मी कोणत्याही पक्षाची मदत न घेता, युती न करता देशातील आगामी सर्व लोकसभा आणि महाराष्ट्रातील सर्व विधानसभेच्या जागा पूर्ण ताकतीने लढवणार आणि ती जिंकून आणणार, असा निर्धार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.

पंढरपूरवरुन जन स्वराज यात्रेला सुरुवात

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वतीने पंढरपूर वरुन जन स्वराज यात्रेला सुरुवात करण्यात आली. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष स्वतः महादेव जानकर हे या यात्रेत सहभागी आहेत. दिड महिन्यापुर्वी सुरू झालेली ही जन स्वराज यात्रा बारामती लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि .२८) पोहोचली. इंदापूर व दौंड तालुक्यात ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या जन स्वराज यात्रेचे स्वागत केले.

दौंड येथे पत्रकाराशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, सध्या जनतेचे राज्य नसून, जनतेचे राज्य आणण्यासाठी ही स्वराज्य यात्रा सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिलांच्या समस्या काय आहे हे जाणून घेत आहे. सध्या दुष्काळाची अवस्था निर्माण झाली आहे. ती सोडवण्यासाठी आणि रयतेचे राज्य यावं यासाठी ही यात्रा काढली आहे. देशातील आगामी लोकसभेच्या ५४३ जागा लढवणार आहे. बारामती,माढा, परभणी यासह लोकसभा मतदारसंघाची तयारी चालू आहे.

बारामती लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे पण पक्षाने मला या जागेवर उमेवारी दिली तर उभा राहील असा मिश्किल टापणी त्यांनी केली. आहे‌. अगोदर लोकसभेचे रणांगण करणार लोकसभेला दिल्लीला जाणार आणि विधानसभा लढविणार. दौंड चे स्थान हे माझ्या हृदयाप्रमाणे मला मोठी मदत केली आहे. ती मला आई प्रमाणे आहे त्यामुळे दौंडच्या तमाम जनतेचा ऋणी आहे. दौंड विधानसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार उभा करणार आणि जिंकणारही असा विश्वास महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Heard the call of mahadev jankar rsps jan swarajya yatra in baramati lok sabha constituency nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2023 | 06:33 AM

Topics:  

  • Daund
  • Mahadev Jankar
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • RSP

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.