मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली.
मुंबई : राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात उष्माघाताचे रुग्णही आढळत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भात सामान्य तापमानापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सिअस जास्त तापमान असून, हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मार्चच्या शेवटच्या टप्प्यापासून सोलापूरच्या तापमानात वाढ होत असून, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद सोमवारी झाली. सोमवारी सोलापूरचे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्याचप्रमाणे सातारा, सांगलीमध्येही कमालाची उकाडा जाणवत असून, साताऱ्याचे 39.7 तर सांगलीचे 38.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्येही तापमान वाढले आहे. जळगावमध्येही 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मुंबई महानगरातही कमालीचा उकाडा जाणवत आहे. ठाण्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे पाहिला मिळाले. तर मुंबईचा पारा 33.8 अन् पालघरमध्ये 36 अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे.
तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढणार
उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढले आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरातील तापमान 40 अंशाच्यावर गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
यंदाच्या मोसमातील 44.2 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमान अकोल्यात नोंदवण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी.