Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उष्माघाताचा कहर! दोन महिन्यांत तब्बल 8 बळी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या उष्णतेचा तीव्र परिणाम पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 03:08 PM
राज्यात उष्माघाताचा कहर! दोन महिन्यांत तब्बल 8 बळी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ

राज्यात उष्माघाताचा कहर! दोन महिन्यांत तब्बल 8 बळी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ

Follow Us
Follow Us:
  • राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  • लातूर, परभणी, अहिल्यानगर, अमरावती आणि हिंगोली येथे उष्णतेमुळे विविध वयोगटातील लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांसोबतच नागरिकांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून भारतात उन्हाळा प्रचंड वाढला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये उन्हामुळे लोकं हैराण झाले आहेत. काही ठिकाणी उन्हाच्या झळा इतक्या वाढल्या आहेत, की लोकांच्या आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत आहे. तसेच काही ठिकाणी वाढत्या उन्हामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागत आहे. राज्यात ही सर्व परिस्थितीत निर्माण झाली असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा ‘स्पेशल फोर्स’चा मास्टरप्लॅन; बागेश्वर बाबांनाही दिला इशारा

लातूरमध्ये उष्माघातामुळे युवकाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडीमध्ये उष्माघातामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश इंगोले असे या तरूणाचे नाव आहे. महेश शेतात काम करून घरी परतला आणि त्यानंतर काही वेळातच तो जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला तात्काळ दवाखान्यात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. महेशचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शाहजानी परिसरात देखील उष्णता प्रचंड वाढली आहे. या ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 26 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लक्ष्मण शेतात काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

नाशिकहून परभणीत आलेल्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाजी बबन कांबळे असं या मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव असून ही घटना 25 एप्रिल रोजी घडली आहे. शिवाजी नाशिकहून परभणीच्या नांदखेडा रोड भागात त्यांच्या भावाला भेटण्यासाठी आले होते. मात्र यावेळी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

लातूरमधूल गोंद्री या ठिकाणी उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी घडली आहे.

उष्माघाताने शिक्षिकेचा मृत्यू

अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यात उष्माघाताने एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 23 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. प्राथमिक शिक्षिका उषा फापाळे (वय 50) यांनी उन्हातून प्रवास केल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितलं जात आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षिका उषा फापाळे यांची प्रकृती उष्माघातामुळेच खालावल्याची शक्यता आहे.

अमरावती 65 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

19 एप्रिल रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ एक मृतदेह आढळला. या व्यक्तीचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती समोर आली आहे. किशोर वासनिक (वय 65) असं मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव आहे.

Prabhani: सावधान! उन्हाचा वाढता धोका; परभणीत उष्माघाताने घेतला पहिला बळी, 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

उष्माघाताने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

हिंगोली बस्थानक परिसरात 15 एप्रिल रोजी एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. उष्माघाताने या व्यक्तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

मालवाहू ऑटोमध्ये आढळला मृतदेह

अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना 15 एप्रिल रोजी घडली. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: Heatwave havoc in the state 8 deaths in just two months rising temperatures raise public concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • heatwave
  • Increase in Temperature
  • Maharashtra Temperature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.