संभाजीनगरमध्ये गुंडांची खैर नाही! पालकमंत्र्यांचा 'स्पेशल फोर्स'चा मास्टरप्लॅन (Photo Credit- X)
ड्रग्सचे वाढते प्रमाण लक्षात आले आहे. शहरात संघटित गुन्हेगारी आता प्रत्येक विभागात तयार होत चालली आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाणे हद्दीत दररोज नवनवीन गुन्ह्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना मी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही वाढत असलेली संघटित गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांकडील एक स्पेशल फोर्स तयार करून गुंडांना शोधणे, त्यांना जेलमध्ये टाकणे, त्यांच्यावर मोक्कासारख्या कारवाया करणे, इतकेच काम या टीमने करायचे आहे. तेव्हाच ही गुंडगिरी थांबेल. किरकोळ गुन्हेगारसुद्धा आज रस्त्यावर चाकू घेऊन फिरताना दिसतोय. लवकरच याचा ऍक्शन प्लॅन तयार होईल अशी माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली.
बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बक्तव्याचा समाचार घेताना मंत्री शिरसाट म्हणाले, बागेश्वर बाबांना काय इतिहास माहिती आहे? शिवाजी महाराज त्यांनी कधी वाचले आहेत का? काहीही वक्तव्य करून स्वतःची विद्वत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबांनी आता बाबागिरी सोडावी आणि राजकारणात यावं, हे त्यांच्यासाठी योग्य राहील. जनसमुदाय ऐकतोय म्हणून कुठलेही वक्तव्य करून लोकांच्या डोक्यात काहीतरी राग घालण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर त्यांची भेट घेतल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. यावरून पडद्यामागे राजकारणात काहीतरी शिजतंय असेही बोलले जात आहे. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र या बातमीत विश्वासार्हता नाही.






