Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची तूफान बॅटिंग; धरणात 5 टीएमसीने वाढ

पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३८ हजारावरून रविवारी ६ तासात ६४ हजार क्युसेक झाली होती. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाली. धरणात सध्या ४०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2024 | 12:25 PM
Heavy Rain

Heavy Rain

Follow Us
Follow Us:

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 64 हजार क्युसेक झाली होती. धरणातील पाणीसाठा 40.43 टीएमसी झाला आहे. कोयना भागातील नेचल गावाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने 2 हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३८ हजारवरून रविवारी ६ तासात ६४ हजार क्युसेक झाली होती. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाली. धरणात सध्या ४०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्राबरोबर कोयना भागात मुसळधार पावसाची रिपरिप चालू असल्याने भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे कोयना भागातील नेचल या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी, प्रशासनाने वाहतुकीस हा रस्ता बंद केला होता. दरम्यान, सायंकाळी उशिरा पावसाचा जोर काहीसा ओसरल्यावर या रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पाटण बसस्थानकात व दुकानांत पाणी

शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर राज्य महामार्गावर असणाऱ्या पाटण बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने काही वेळ बस वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले होते. बसस्थानकाशेजारील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
नेरळे फाट्यावरील काही दुकानात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले. तसेच पाटण-मोरगिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.

सोमवारी सकाळी पावसाची आकडेवारी

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत कोयनानगर १२२ (१९८२ ), नवजा २७४ (२२९९), महाबळेश्वर ९९ (१७५२) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

Web Title: Heavy rain in koyna dam areas nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 12:24 PM

Topics:  

  • Koyna Dam
  • maharashtra

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.