Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात पावसाचा कहर; 18 जणांचा मृत्यू तर तब्बल साडेचार हजार घरांची पडझड

विदर्भातील नागपूर विभागात सुरू असलेल्या संततधारेनंतर पूर आणि वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू (18 Died Due to Heavy Rain) झाला आहे तर 4500 घरांची पडझड झाली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे 54,000 हेक्टरमधील शेतजमीन प्रभावित झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2023 | 10:16 AM
विदर्भात पावसाचा कहर; 18 जणांचा मृत्यू तर तब्बल साडेचार हजार घरांची पडझड
Follow Us
Follow Us:

नागपूर / गडचिरोली : विदर्भातील नागपूर विभागात सुरू असलेल्या संततधारेनंतर पूर आणि वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू (18 Died Due to Heavy Rain) झाला आहे तर 4500 घरांची पडझड झाली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे 54,000 हेक्टरमधील शेतजमीन प्रभावित झाली आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर विभागात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये ज्या 18 जणांचा मृत्यू झाला. त्यात अमरावती 4, यवतमाळ, गडचिरोली आणि भंडाऱ्यात प्रत्येकी तीन, वर्धा, गोंदियात प्रत्येकी दोन तर चंद्रपुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

रविवारी सकाळी चंद्रपूर-बल्लारपूर- राजुरा हा मार्ग बंद झाला. बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. कोरपना तालुक्यातील भोयगाव धानोरा पुलावर 21 जुलैच्या रात्रीपासूनच पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग तेव्हापासूनच बंद आहे. विदर्भातील 4500 घरांची पडझड झाली असून, 54,000 हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे.

39 जनावरांचा मृत्यू

अहवालानुसार, नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये 1675 घरांची पडझड झाली असून 39 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात अकोल्यात 107.9, यवतमाळ 24, वर्धा 23.4, अमरावती 15.6, नागपूर 6.7, गडचिरोली 3.0, गोंदिया 2.2, ब्रहापुरी (चंद्रपूर) 2.4 तर बुलडाणा येथे 2.0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

पैनगंगेला पूर, गावांचा संपर्क तुटला

महाराष्ट्र आणि आंध्र सीमेलगतच्या पारडी आणि खातेरा गावाच्या मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुरामुळे या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पारडी-खातेरा मार्ग बंद झाला आहे. पारडी चंद्रपूर तर खातेरा यवतमाळ हद्दीत आहे. त्यामुळे या भागातील दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे

Web Title: Heavy rain in vidarbha 18 people died and nearly four and a half thousand houses collapsed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 10:16 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur Flood
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
1

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
2

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
3

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
4

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.