
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाला लागणारा वेळ कमालीचा कमी झाला आहे. मात्र, वाढते अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. समृद्धी मार्गावरच का घडताहेत अपघात, यावर अभ्यासही करण्यात आले आहेत. त्यातून ‘महामार्ग संमोहन’ हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.
कोणत्याही अडथळ्याविना महामार्गावर वाहन सरळ एकाच दिशेने धावत असते. तेव्हा चालकाच्या शरीराची हालचाल स्थिर होते. चालकाचा मेंदू प्रतिक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्याला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. विशेष म्हणजे या महामार्गावर बहुतांश अपघात हे रात्रीच्या वेळी पडले आहेत. शुक्रवारी पहाटे शेगाव येथून दुगदिवीची मूर्ती घेऊन वध्र्याकडे जाणाऱ्या वाहनाला धामणगावनजीक भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले. या अपघाताने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या साडेतीन वर्षात या महामार्गावर ६३३ अपघातांमध्ये ५७२ जणांचा मृत्यू असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवासाठी दुर्गामातेची मूर्ती आणण्याची तयारी या मंडळाकडून सुरू होती. मात्र, देवीची मूर्ती घेऊन परतत असतानाच झालेल्या या भीषण दुर्घटनेने उत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले. एका बाजूला नवरात्रोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला मंडळातील कार्यकत्यांच्या मृत्यूमुळे वर्धा आणि परिसरात शोक व्यक्त होत आहे.
कोणत्या कारणांमुळे होताहेत अपघात?
‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातासाठी कारणीभूत असल्याचे अभ्यासातून सांगण्यात आले आहे. लेन कटिंग’ हे देखील एक मुख्य कारण आहे. आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जाताना योग्य ती काळजी घेत नियमांचे पालन करायला हवे. तसे न केल्यास लेने बदलणारी व्यक्त्ती दुसन्या लेनवर जाते, तेव्हा त्या लेनवरील मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज येत नाही, या कारणामुळे अपघात होतात. ५१ टक्के ट्रकचालक लेन ओलांडण्याचे नियम पाळत नाहीत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
Accident News : रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू