Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून कोयना धरणात ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ३९२ मिमी पाऊस झाला असून ९४ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 09:28 PM
सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! (Photo Credit - X)

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम!
  • कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा
  • प्रशासन सतर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्याच्या ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची भराव क्षमता ३३.९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरण क्षेत्रात सुमारे ९३ हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात ७ जुलैअखेर सरासरी २८८.७ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात तब्बल २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. महाबळेश्वर महसूल मंडळात सर्वाधिक ३९२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी १६९ मि.मी., वाठार येथे १४८.५ मि.मी, पाचगणी १३६.५१ मि.मी, करहर व केळघर येथे १२४.५ मि.मी., पसरणी ११०.३ मि.मी. आणि पाटण येथे १००.५ मि.मी. पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यांतील एकूण ९४ नागरिकांचे सुरक्षित स्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे आणि नातेवाईकांच्या घरी हलविण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील ८३ घरांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात सर्वाधिक ३९, सातारा ९, जावली ११, वाई १३, महाबळेश्वर ९ आणि खंडाळा २ घरांची पडझड झाली असून संबंधित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडून नुकसान झाले असून मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धबधबे, ओढे आणि पाण्याचा वेग असलेल्या पर्यटनस्थळांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. झाडे पडणे, दरडी कोसळणे किंवा रस्ते खचल्याच्या घटना घडल्यास तातडीने मार्ग मोकळे करण्याचे तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (७ जुलै) :

कोयना: ३५.७१ टीएमसी (३३.९३%)
धोम: ६.५९ टीएमसी (४८.८१%)
धोम-बलकवडी: २.१७ टीएमसी (५३.९१%)
कण्हेर: ६.२९ टीएमसी (६२.२८%)
उरमोडी: ४.५० टीएमसी (४५.१८%)
तारळी: १.७३ टीएमसी (२९.५७%)

Satara Accident: ताथवडे घाटात दरड कोसळून कारचा चक्काचूर; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Web Title: Heavy rainfall continues in satara district koyna dam holds 3571 tmc of water administration on alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Koyna Dam
  • mansoon
  • Satara News
  • Satara Rain

संबंधित बातम्या

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी
1

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

शिरवळमध्ये अमली पदार्थांविरोधात एक दिवसीय बंद पाळत जनआक्रोश; पोलिसांना दिले गेले निवेदन
2

शिरवळमध्ये अमली पदार्थांविरोधात एक दिवसीय बंद पाळत जनआक्रोश; पोलिसांना दिले गेले निवेदन

कराड-पाटणच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज; 28 जवानांचे विशेष पथक कराडात दाखल
3

कराड-पाटणच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज; 28 जवानांचे विशेष पथक कराडात दाखल

Mahabaleshwar Rain Record: महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहा:कार, २४ तासांत तब्बल २० इंच पाऊस; जुने सर्व रेकॉर्ड मोडीत
4

Mahabaleshwar Rain Record: महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहा:कार, २४ तासांत तब्बल २० इंच पाऊस; जुने सर्व रेकॉर्ड मोडीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.