Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड-चिपळूण मार्गावरील अवजड वाहतूक ६० दिवसांसाठी वळवली; धांडे पुलाच्या पुनर्बांधणीमुळे वाहतुकीत मोठा बदल

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील महत्त्वाच्या धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसह बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम होणाप आहे. यामुळे पर्यायी रस्त्यात बदल करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 02:24 PM
Heavy Vehicle Traffic Suspended on Karad-Chiplun Route Alternate Route Made Satara News

Heavy Vehicle Traffic Suspended on Karad-Chiplun Route Alternate Route Made Satara News

Follow Us
Follow Us:
  • धांडे पुलाची पुनर्बांधणी होणार
  • कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील वाहतूकीत बदल
  • पर्यायी मार्गांची केली व्यवस्था
Satara News : कराड :  कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील महत्त्वाच्या धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसह बाजारपेठेतील काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी सुमारे ६० दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, या दरम्यान वाहतुकीत (Road Traffic) मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित करत आदेश जारी केले आहेत. (Satara News)

या निर्णयानुसार कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक पुणे-बंगळुरू महामार्गावरून पाचवड फाटा, उंडाळे, कोकरुड, मलकापूर, आंबा घाट मार्गे संगमेश्वरवरून चिपळूणकडे वळवण्यात आली आहे. तसेच चिपळूणहून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूकही याच पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांचा ‘लेटरबॉम्ब’! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाचा नवा संघर्ष

दरम्यान, हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आला आहे. कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी हलकी वाहतूक नवारस्ता, गव्हाणवाडी फाटा, नेरळे, गौंड या मार्गाने पुढे जाईल. तसेच चिपळूणहून येणारी हलकी वाहतूकही याच मार्गाचा वापर करून कराडकडे येणार आहे.
वाहतुकीत बदल करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या कामामुळे काही काळ गैरसोय होणार असली तरी, भविष्यातील सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत मोठा गैरप्रकार? मनसेचा भाजपवर गंभीर आरोप

म्हसवड शहरात राम नवमीचा उत्साह 

सातारा जिल्ह्यातील म्हसवड शहरात शशीकिरण, डॉ. सचिन व अमोल देशमाने ही तीन भावंडे शहरातील सिध्दनाथ मंदिरासमोर एकत्रित रहावयास असुन त्यांच्या निवासस्थानी इ.स.सन १४ व्या शतकातील काळ्या पाषाणातील प्रभु श्रीरामाची मुर्ती आहे. या मुर्तीचा इतिहास मोठा असुन देशमाने कुटुंबियांनी या मुर्तीची प्रतिष्ठापणा आपल्या घरातील छोट्याशा मंदिरात केली आहे. दर रोज नित्य नियमाने प्रभु श्रीरामाची ते पुजा करीत आहेत, तर रामनवमी निमित्त त्यांनी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. यानिमीत्त प्रभु श्रीरामाचा पाळणा उभारण्यात आला होता तर सश्राव्य अशा भजनाचाही कार्यक्रम ही आयोजित केला होता. दुपारी ठिक १२ वाजता प्रभु श्रीरामाच्या मुर्तीवर भाविकांकडुन पुष्पवृष्टी करण्यात आली तद्नंतर महिलावर्गाने प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालुन पाळणा म्हटला त्यानंतर महा आरती संपन्न होवुन सर्वांनी प्रभु श्रीरामाच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी केली तद्नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद लुटला.

Web Title: Heavy vehicle traffic suspended on karad chiplun route alternate route made satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Road Traffic
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.