Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

रायगडमधील एका गावात अपरिचित असणाऱ्या गडावर एक शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 07:21 PM
कोकणातील 'या' गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

कोकणातील 'या' गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

Follow Us
Close
Follow Us:
  • रायगडमधील तळगड येथे सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा
  • दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांची विशेष मेहनत
  • मातीचा ढिगारा उपसून शिवकालीन गुप्त दरवाजा शोधला
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालतात ते आपल्या शिवरायांचे अभेद्य गड-किल्ले. आपल्या महाराष्ट्रात 350 पेक्षा अधिक गड-किल्ले आहेत. मात्र, यातील अनेक किल्ल्यांवर काही नवीन आणि रहस्यमयी गोष्टी निदर्शनास येतात. शिवराय नेहमीच त्यांच्या किल्ल्यांवर गुप्त किंवा चोरवाटा निर्माण करत असत, जेणेकरून शत्रूचा वेढा फोडला जाईल. याच चोरवाटा आणि गुप्त दरवाजांच्या पाऊलखुणा आजही गड-किल्ल्यांवर पाहायला मिळतात. नुकतेच रायगडमधील एका गडावर गुप्त दरवाजा सापडला आहे.

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार

तळगडावर सापडला गुप्त दरवाजा

रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला आहे. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. अभ्यासकांकडून गडाची माहिती, नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.

१५ ते २० सदस्यांनी मिळून उपसला मातीचा ढिगारा

१६५९ साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने या तळगडाला वेढा घातला असल्याची माहिती आहे, तळगड तसा लहान किल्ला, त्यामुळे याचा घेरपण लहान असल्याने हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या तळगडावर गुप्त दरवाजा असल्याची माहिती दुर्गरत्न प्रतिष्ठानला मिळाली.

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

रांगोळी काढून फुलांच्या हाराने दरवाजा सजवला

त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अभ्यासकांची भेट घेत अभ्यासकांकडून गडाचा नकाशा समजून घेतला आणि त्यानंतर गडाची माहिती घेतल्यानंतर गडावर एक गुप्त दरवाजा असल्याचे लक्षात आले. पहिल्या मोहिमेत १५ ते २० सदस्यांनी अर्धा मातीचा ढिगारा उपसून काढला. पुन्हा दुसऱ्या दिवशी ४५ ते ५० सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन चोर दरवाजा शोधून काढला. यानंतर दरवाजाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला, त्याठिकाणी आकर्षक रांगोळी काढून फुलांच्या हाराने दरवाजा परिसर सजवण्यात आला होता. त्यानंतर दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रतिष्ठानच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणत महाराजांना आदरांजली वाहिली.

Web Title: Hidden and secret shivkalin door found on talgad fort in raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • fort
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग
1

Raigad News: रेवस-करंजा रो-रो सेवा पुन्हा चर्चेत! प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक
3

Raigad News: उरणकरांसाठी दिलासादायक बातमी! उरण-नवी मुंबई रेल्वे फेऱ्यांत होणार वाढ, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण
4

Raigad News: उरण-पनवेल राज्य महामार्गाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गाच्या कामाचा वेग मंदावला! वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.