मराठा आरक्षणाच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
राज्य सरकारने काढला होता मराठा आरक्षणाचा जीआर
जरांगे पाटलांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्या होत्या
Manoj Jarange Patil: राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. त्या जीआरला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान आज मुंबई हायकोर्टात त्याबाबत सुनावणी पर पडली. राज्य सरकारने काढलेल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेताना हायकोर्टाने जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
२ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णयाला स्थगिती देण्यास नकार हायकोर्टाने दिला आहे. हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ सुनावणी घेऊनच निर्णय देणे शक्य असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
राज्य सरकारला तातडीने किंवा काही कालावधीत उत्तर देण्याचे निर्देश देता येणार नाहीत असे हायकोर्टाने म्हटले आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत शासन निर्णयानुसार, प्रमाणपत्र न देण्याची मागणी देखील हायकोर्टाने सांगितले आहे.
मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी
मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करत असताना, ही भाषा सुसंस्कृत आणि समंजस असलेल्या मराठा समाजाला शोभणारी नाही, हे लक्षात घ्यावे. मनोज जरांगे यांच्या भाषेने मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. मराठा समाजाची ही भाषा नव्हे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
मनोज जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी, आरक्षणाचा लढा हा…; काँग्रेसच्या नेत्याने सुनावले खडेबोल
मनोज जरांगे यांनी राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली असली तरी राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेसाठी रान पेटवले आहे आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय व कोणालाही न दुखावता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग, हा याच ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्धारातून सुकर होईल. काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून कोणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.