बाळसाहेब थोरातांचे आरक्षणाबाबत भाष्य (फोटो-ani)
सातारा गॅझेटवरून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला याबाबत ठोस धोरण राबवण्याचे आवाहन केले.मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबविण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करताना थोरात म्हणाले, हा अत्यंत परिपक्व व महत्वाचा निर्णय आहे. आंदोलन चिघळले असते तर, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाले असते. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची, मुंबईची व सर्वसामान्यांची काळजी घेत आंदोलन थांबवले, ही त्यांची दूरदृष्टी आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, ते पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व आहेत, मात्र सध्या ते सरकारमध्ये असह्य मानसिकतेने काम करत आहेत, हे दुःखद आहे.भारतीय जनता पक्षाचे ध्येय केवळ सत्ता हेच असून, ते कोणतीही पद्धत वापरायला मागे हटत नाहीत. पक्षफोड, निवडणूक आयोगाचा ताबा, धर्माचा राजकारणात वापर, समाजात भेद निर्माण करणे हे सर्व लोकशाहीला अपुरक असल्याची टीका थोरात यांनी केली. राज्यातील रस्ते ठेकेदार आत्महत्या करत आहेत.
संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजनांचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे, असे थोरात यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेत सर्वधमय व सर्वपक्षीय लोक सहभागी होत असतात. मात्र भाजपाने बोलघेवडे महाराज तयार करून वारकरी परंपरेचा अवमान केल्याचा आरोप थोरात यांनी केला. लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून जागृतीने व प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. लोकशाही निरोगी झाली पाहिजे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.
Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य
छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या जीआरवर भाष्य केले आहे. एका तासात दोन जीआर निघाले. त्यावर शासनाच्या सचिवांची सही आहे. पहिल्या जीआरमध्ये असणारा पात्र हा शब्द दुसऱ्या जीआरमध्ये काढण्यात आला. कारण त्या शब्दावर जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला होता. दुसऱ्या जीआरमध्ये पात्र शब्द काढला गेला. तर मी गप्प कसा राहू शकतो? मी माझी प्रतिक्रिया देणारच.