Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उद्योगाचा उच्चांकी ‘टर्न ओव्हर’; माजी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांची माहिती

साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात ताकद आहे, असा विश्‍वास राज्याचे माजी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी व्यक्‍त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 28, 2023 | 07:37 AM
साखर उद्योगाचा उच्चांकी ‘टर्न ओव्हर’; माजी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राला साखर उद्योगाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. यावर्षीचा साखर उद्योगाचा “टर्न ओव्हर’ एक लाख आठ हजार कोटींचा झाला असून पुढच्या तीन वर्षांत आपण अडीच लाख कोटींचा उच्चांकी टर्न ओव्हरचा टप्पा गाठू शकतो, एवढी ताकद साखर उद्योगामध्ये आहे. किंबहुना साखर उद्योगाचे जागतिक नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात ताकद आहे, असा विश्‍वास राज्याचे माजी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी व्यक्‍त केला.

साखर संकुलच्या माध्यमातून साखर आयुक्‍त या नात्याने शेखर गायकवाड यांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णयांप्रती ऋण व्यक्‍त करण्यासाठी “वस्मा’अर्थात “वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन’तर्फे शेखर गायकवाड आणि साखर संचालक उत्तम इंदलकर यांच्या “विशेष कृतज्ञता सत्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “महाराष्ट्र राज्य साखर उदयोगाचा भविष्यवेध’ याविषयी मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. यावेळी साखर संचालक उत्तम इंदलकर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मुंबईचे महाव्यवस्थापक शशी प्रकाश, “विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महासचिव पांडुरंग राऊत, कार्यकारी संचालक अजित चौगुले यांच्यासह बजरंग सोनवणे, महेश कर्पे, ज्ञानेश्‍वर नवले आदी उपस्थित होते.

बायोफ्युएल धोरण

सहकारी आणि खासगी असे एकूण २०० साखर कारखाने असलेले महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात अव्वल राज्य आहे. कारखान्यांमध्ये स्पर्धा नसून ते एकमेकांना पूरक आहेत. साखर उद्योग अधिक उंचीवर नेण्यामध्ये या दोघांचा मोलाचा वाटा आहे, असे उत्तम इंदलकर यांनी सांगितले. बायोसीएनजी बायोफ्युएलची भारताची दिवसागणिक मागणी वाढत असून ८० टक्के आयातीवर तर २० टक्के स्वतः निर्मिती करीत आहोत. बायोफ्युएल धोरणाला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शशी प्रकाश यांनी स्पष्ट केले.

Web Title: High turn over of sugar industry information of former sugar commissioner shekhar gaikwad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2023 | 07:37 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन
1

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा
2

Mumbai Metro 3 मध्ये बुलेट ट्रेन स्टेशन आणि रेसकोर्सला जोडणारे दोन नवीन सबवे बांधले जाणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
4

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.