सोलापूर : हिजाब हा विषय नविन नाहीये तो जुनाच आहे. पण ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रचारा दरम्यानच हा मुद्दा पुढे का केला जातोय.’काश्मीर फाईल्स’ पेक्षा (Kashmie Files) ‘गुजरात फाईल्स’ एकदा वाचून बघाव, राजसत्तेवर असणाऱ्यांनी याचा प्रोपोगंडा करावा याचा शोध त्यांनीच करावा असं विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी सोलापुरात केलंय.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सध्या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा होताना दिसतेय. राजकीय वर्तुळातूनही याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. याबद्दल बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या देशात हिजाब, काश्मीर फाईल्स, गुजरात फाईल्स हे मुद्दे जास्त चर्चीले जातायत. पण ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रचारा दरम्यानच हा मुद्दा पुढे का केला जातोय.’काश्मीर फाईल्स’ पेक्षा ‘गुजरात फाईल्स’ एकदा वाचून बघावा, असे ते म्हणाले. त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विधानला महत्व प्राप्त झालंय.
[read_also content=”सनसनाटी निर्माण करू नका! हिजाब प्रकरणी तातडीने सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार https://www.navarashtra.com/india/dont-create-a-sensation-immediate-refusal-of-supreme-court-hearing-in-hijab-case-259462.html”]