Sanjay Raut PC : भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने.... ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाण्यात स्वबळावर लढण्याचा मनसुबा आबेत. त्यासाठी ठाण्यातील कापूरवाडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावून प्रचाराला सुरुवात केला आहे. त्यावर, कमळाच्या चिन्हासह नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख असलेले बॅनर्सही लावले आहेत. भाजपलाच यावेळी ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
त्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कसून तयारी सुरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवारीच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून उमेदवारी अर्ज भरण्यालाही सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, युती असूनही काही जागांवर उमेदवारीबाबत ताणतणाव आणि चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्या जागा आम्ही त्यांना देऊ शकलो. यात खरतंर शिवसेनेचं नुकसान झालं आहे, पण युती किंवा आघाडीत असे होत असते. ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्या त्या आमच्या सिटींग जागा आहेत. तिथे आमचेही लोक नाराज झालेत. आमच्या लोकांचीही संधी गेली. आघाडी आणि युती एका विशिष्ट हेतूने झालेल्या आहेत, भविष्यात सत्ता येईल तेव्हा अनेक पदे उपलब्ध होतील, तेव्हा त्या नाराज कार्यकर्त्यांना सामावून घेतलं जाईल.
भाजप सत्तेत आल्यापासून प्रत्येक निवडणुकीत बंडाळ्या वाढत चालल्या आहेत. भाजपकडूनच त्याला प्रोत्साहन मिळत आहे. पूर्वी निवडणुकीत मोजकेच पक्ष होते पण आता अनेक पक्ष झाले आहेत. त्यामुळे पर्याय उपलब्ध होत आहेत. मग त्यात पैशाचा वापर करून लोक विकत घेतले जातात. त्यातून बंडाळ्यांना उत्तेजन दिले जाते.
भाजपकडून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांना आणले जाणार आहे. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपने मुंबईची फाळणी केली आहे. एक परप्रांतीय उत्तर भारतीयांची मुंबई आणि दुसरी मराठी माणसाची मुंबई, अशी फाळणी केली आहे. पण आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एकच आहे. जे मुंबईकर आहेत, त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं, पण भाजपने केवळ प्रांतवाद, जातवाद आणि धर्मावादाच्या आधारावर निवडणुका लढल्या आता मुंबईतही ते तेच करत आहेत. तुम्हाला आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, किंवा अन्य परप्रांतीय नेते मुंबईत कशासाठी पाहिजेत,असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
मुंबईचा मतदार मुंबईचा नागरिक आहे, तर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे, तुम्ही योगी आदित्यनाथ, रेखा गुप्ता, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणणार, म्हणजे, त्या त्या प्रांतातील लोकांना आणून त्या भागातील मतदारांना आकर्षित करणार, मग तुम्ही काय करताय, जिंकण्याची गोष्ट करताय, मग तुम्ही जिंकून दाखवा ना, असा टोलाही त्यांनी लगावला






