Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना

औंढा नागनाथ-जिंतूर महामार्गावरील रामेश्वर शिवारात सोमवारी (१ जून) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास प्लायवूडची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने ट्रकसह संपूर्ण माल जळून खाक झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 02, 2026 | 01:37 PM
भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना

भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना

Follow Us
Follow Us:
  • भीषण आगीत ट्रक जळून खाक
  • सुदैवाने चालक बचावला
  • हिंगोली जिल्ह्यातील घटना
हिंगोली : औंढा नागनाथ-जिंतूर महामार्गावरील रामेश्वर शिवारात सोमवारी (१ जून) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास प्लायवूडची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने ट्रकसह संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातून लाकडी प्लायवूड घेऊन ट्रक (क्र. केए १९ – डिएम ३५३५) औंढा नागनाथमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे निघाला होता. सोमवारी (१ जून) सकाळी सुमारे ९ वाजता रामेश्वर शिवारात पोहोचताच ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण वाहनाला वेढले.

वाहतूक काही काळ बंद

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मात्र तातडीने औंढा नागनाथ नगर पंचायत अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत ट्रकमधील मोठ्या प्रमाणातील प्लायवूड आणि वाहनाचा मोठा भाग आगीत भस्मसात झाला होता. आगीची तीव्रता लक्षात घेता ती शमविण्यासाठी अग्निशमन दलाला जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान, संभाव्य धोका टाळण्यासाठी औंढा नागनाथ-जिंतूर महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. आग विझल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा : लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश

पोलिस अधिकाऱ्यांनी केली घटनेची पहाणी

या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल इंगोले, राजकुमार कुटे, तानाजी ढाकरे तसेच अग्निशमन दलाचे गजानन वाशीमकर व एस. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या आगीत चालक साबेर पठाण हे सुखरूप बचावले असले तरी ट्रक आणि त्यावरील प्लायवूड जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा : 30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

Web Title: A truck has been gutted in a massive fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Fire News
  • maharashtra
  • Truck

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.