हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत
सुमारे ८ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून उभारलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ (पिंक लाईन) चे लोकार्पण झाले. या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी केली गेली.
हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर दरम्यान धावणारी सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही ‘पिंक लाईन’ माण ते डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्थानकाला जोडते. पुण्यातील प्रमुख रोजगार केंद्र असलेले हिंजवडी थेट मध्यवर्ती भागाशी जोडले गेल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो आयटीयन्स आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमआरडीएने पुणेरी मेट्रोसाठी सवलत करारानुसार अंतरावर आधारित अधिकृत भाडेदर निश्चित केले आहेत.
13500 कोटींच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या दुसऱ्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या काही मार्गाचा समावेश असून, यामुळे शहराच्या सर्व दिशांना मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे.
मेट्रो वेळापत्रक आणि फेऱ्या
मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. पीक अवर्समध्ये दर ६ मिनिटांनी, तर इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावेल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयासाठी शेवटची ट्रेन रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालयावरून माणकडे रात्री ११.४० वाजता शेवटची गाडी सुटेल. जिल्हा न्यायालय स्थानकावर महामेट्रोच्या लाईन-१ व लाईन-२ शी थेट इंटरचेंज जोडणी देण्यात आली असून, प्रवाशांसाठी संयुक्त अॅप आणि ‘एनसीएमसी’ कार्डची सोय असेल.
FAQ
1. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा कधी सुरू होणार?
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
2. मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले आहे.
3. पुणे मेट्रोच्या किती रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे?
तब्बल २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होणार आहे.






